नाशिक

भुसावळला धन्वंतरी जयंती ऐ

CD
ॲंकर BSW26B12206 भुसावळ : धन्वंतरी जयंतीच्या कार्यक्रमात वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, रजनी सावकारे, डॉ. राहुल पांडे, डॉ. विजेश चौधरी, डॉ. उमाकांत चौधरी आदी. BSW26B12207 भुसावळ : धन्वंतरी यज्ञात सहभागी डॉ. मृणाल पाटील, चेतन पाटील, डॉ. राहुल पांडे, आदिती पांडे, प्रिया पाटील आदी. ----------------- पर्यावरण शुद्धीसाठी धन्वंतरी यज्ञ महत्त्वाचा --------- डॉ. राहुल पांडे : भुसावळात धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम, मंत्री सावकारेंची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. ६ : धन्वंतरी यज्ञाच्या वेळी घातल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती व शुद्ध गाईच्या तुपाच्या आहुतीमुळे वातावरणातील हानिकारक जंतू नष्ट होतात. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा यज्ञ ''पर्यावरण शुद्धी'' व ''वायुप्रदूषण मुक्ती''साठी अत्यंत उपयुक्त ठरतो, असे मत आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष डॉ. राहुल पांडे यांनी व्यक्त केले. येथील श्री धन्वंतरी मंदिरात आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी यांच्या जयंतीनिमित्त भक्तीभावाने ‘धन्वंतरी यज्ञ’ आयुर्वेद व्यासपीठ व निमा शाखेने या यज्ञाचे शुक्रवारी (ता.६) आयोजन केले होते, त्यावेळी डॉ. पांडे बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची विशेष उपस्थिती होती. या धन्वंतरी यज्ञाचे यजमानपद डॉ. पांडे, अदिती पांडे, डॉ. मृणाल पाटील व चेतन पाटील यांनी भूषवले, तर पौरोहित्य प्रवीण राजवैद्य, जितेंद्र आठवले, स्वप्निल जोशी, दीपक पाथरकर व गौरव जोशी यांनी केले. मंत्री सावकारे त्यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करण्यात आली. डॉ. पांडे पुढे म्हणाले की, यज्ञातील सुगंधी धुरामुळे श्वसनसंस्थेला आराम मिळतो व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यज्ञादरम्यान होणारे वैदिक मंत्रोच्चार व सुगंधी द्रव्यांचा प्रभाव मानवी मनावर खूप शांत करणारा असतो. त्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होऊन समाजात एक सकारात्मक, उत्साही व चैतन्यमय वातावरण निर्माण होते. ​थोडक्यात हा यज्ञ केवळ एक विधी नसून, आध्यात्मिक ऊर्जा, शुद्ध पर्यावरण, उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य या तिन्हीचा संगम आहे, जो दिवाळीच्या पवित्र पर्वाला अधिक अर्थपूर्ण बनवतो, असेही डॉ. पांडे म्हणाले. याप्रसंगी निमाच्या भुसावळ शाखेचे अध्यक्ष डॉ. विजेश चौधरी, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, परिसरातील डॉक्टर व नागरिक उपस्थित होते. ---------- एकमेव सार्वजनिक धन्वंतरी मंदिर भुसावळमधील धन्वंतरी मंदिर हे राज्यातील एकमेव सार्वजनिक धन्वंतरी मंदिर आहे. आयुर्वेद संशोधन सेवा मंडळाचे संस्थापक वैद्य डॉ. श्रीकर जळूकर यांच्या अथक प्रयत्नाने हे मंदिर साकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Latest Marathi News Update : गडचिरोलीत माओवाद्यांचा कट उधळला; जंगलात जमिनीखाली लपवला होता स्फोटकांचा साठा

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

SCROLL FOR NEXT