On the second Sunday of the month of Dhanurmas, the rays of the sun fall on the Padakamala of Adimaya. In the second picture, the crowd of devotees to go to the temple from the first step esakal
नाशिक

Dhanurmas Utsav: धनुर्मास उत्सवात भाविकांची मांदियाळी! सप्तशृंगी गडाला भाविकांच्या गर्दीमुळे यात्रोत्सवाचे स्वरूप

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आदिमायेच्या दर्शनासाठी रविवारी (ता. २४) भाविकांची एकच गर्दी उसळली होती

सकाळ वृत्तसेवा

वणी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आदिमायेच्या दर्शनासाठी रविवारी (ता. २४) भाविकांची एकच गर्दी उसळली होती. सप्तशृंगी गडावर यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. (Dhanurmas Utsav Devotees feast form of pilgrimage due to crowd of devotees to Saptashrungi Fort nashik)

सप्तशृंगी गडावर शनिवारी (ता. २३), रविवार व सोमवारी (ता. २५) ख्रिसमस, अशी सलग तीन दिवस सुट्टीमुळे शनिवारपासून गडावर भाविकांची मोठी गर्दी आहे.

धनुर्मासातील दुसरा रविवार असल्याने आदिमायेच्या मूर्तीवर पडणाऱ्या सूर्याचे किरण बघण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशाबरोबरच राज्यभरातून लाखावर भाविक गडावर दाखल झाले होते.

धनुर्मासातील महापुजेस पहाटे पाचपासून पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. सूर्यनारायणाचे किरण आदिमायेच्या पायांवर पडताच मंदिर गाभाऱ्यांतील दिवे बंद करून महाआरती झाली.

दुपारी आदिमायेस तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाचे लाडू, वांग्याचे भरीत आदी पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सकाळी भाविकांच्या कासव टप्प्यापर्यंत, तर सायंकाळी उशिरापर्यंत राममंदिर टप्प्यापर्यंत दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या.

फ्यूनिक्युलर ट्रॉली रोप-वेच्या टिकीटासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गर्दीमुळे रोप-वेचे प्रतिक्षालय भरले होते. ट्रॉलीसाठी रांगा लागल्या होत्या.

सर्वसाधारण पाच मिनिटाच्या अंतराने ट्रॉलीची ये-जा सुरू असली, तरी ट्रॉलीद्वारे मंदिरात जाण्यासाठी एक तासांची प्रतिक्षा करावी लागत होती. फ्युनिक्युलर ट्रॉलीची गर्दी बघून भाविकांनी पायरी रस्त्याची वाट धरली.

गडावरील व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. गडावर खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने गडावर वाहतूक कोंडी होत होती.

राज्य परिवहन महामंडळाने नाताळाची सुट्टीनिमित्त नाशिकसह जिल्ह्यातील आगारातून गडासाठी अतिरिक्त बसणे सोडणे अपेक्षित असताना, नियमित बसच गडावर वाहतूक करीत असल्याने भाविकांना नाइलाजास्तव खासगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT