धुळे : टुडे पान २ साठी....
--
फोटो क्रमांक : 33899 - धीरज पाटील.
--
एसटी कामगार सेनेच्या
विभागीय अध्यक्षपदी पाटील
--
सचिवपदी परदेशी; संघटना मजबूतीची पदाधिकाऱ्यांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या दौऱ्यात धुळे विभागीय अध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख धीरज पाटील तर सचिवपदी लिपिक प्रशांत परदेशी यांची सर्वानुमते निवड झाली. खासदार अरविंद सावंत व सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या आदेशानुसार झालेल्या या दौऱ्यात राज्य उपाध्यक्ष शिवाजी बोर्डे पाटील, विजय पवार, अमोल गोरे, सुधीर पटवारी व सचिन पटवारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची निवड केली.
शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांची भेट घेऊन शिंदखेडा आगाराचे पीक सीजन बिल, अक्कलकुवा आगारातील मनुष्यबळ व क्रू ड्युटीच्या तफावतीविषयी चर्चा केली. यावर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मिळाले. कार्यशाळेत कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेण्यात आल्या. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, तसेच विविध आगारांचे पदाधिकारी उपस्थित होते. आगारातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष धीरज पाटील यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल संपर्कप्रमुख अशोक धात्रक, माजी आमदार अनिल गोटे, निंबा मराठे, तेजस गोटे, प्रशांत भदाने, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, डॉ. अनिल पाटील, अण्णा फुलपगारे, जवाहर पाटील, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, दीपक बडगुजर, किशोर पाटील, विनोद धनगर आदींनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.