नाशिक

धोंडबार-औंढेवाडी मार्गासाठी १० कोटीची मान्यता आमदार कोकाटे, उदय सागळेंकडून पाठपुराव्याचे दावे (सुधारीत बातमी)

CD
पान तीन -------------- धोंडबार-औंढेवाडी मार्गासाठी १० कोटीची मान्यता आमदार कोकाटे, उदय सागळेंकडून पाठपुराव्याचे दावे सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १४ : धोंडबार-औंढेवाडी मार्गासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास मान्यता दिली. आमदार माणिकराव कोकाटे, भाजप नेते उदय सांगळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. दोघांकडूनही या कामाचे दावे करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही गटांकडून दावे करण्यात येत असले तरी अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने या गावातून त्याचे स्वागत केले जात आहे. सांगळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार गणेश गिते यांची त्यासाठी मदत झाल्याची माहिती दिली. यावेळी भाजपचे सुनील माळी बहिरु दळवी, सजन सांगळे, गटनेते अनिल सरवार, नगरसेविका आशा कर्पे, विनोद शितोळे, युगंधर वाजे, देवा वाजे, धोंडबार व औंढेवाडीचे ग्रामस्थ राजेश शिंदे, दीपक खेताडे, राहुल साबळे, गणेश खेताडे, सिध्दार्थ खेताडे आदी उपस्थित होते. धोंडबार व औंढेवाडी येथील रस्त्यासाठी आदिवासी बांधवांनी दीड महिन्यापासून आंदोलन सुरु केले होते. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन झाले. त्यानंतर सिन्नर-घोटी महामार्ग रोखण्यात आला होता. आमदार कोकाटे यांच्या कार्यालयाकडूनही याबाबत केलेल्या पत्र्यवहाराची माहिती देण्यात आली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दिलेल्या पत्राची माहिती देत हा रस्ता होणे गरेजेचे असून १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पुण्याला मिळाले नवीन वैद्यकीय महाविद्यालय! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; पुढच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु

Vastu Tips: कपाटाच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' ५ गोष्टी; घरात येऊ शकते गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा! जाणून घ्या वास्तुनियम...

IPL 2027 Trade: यॉर्करने भल्याभल्यांना गार करणारा गोलंदाजाचं SRH संघात पुनरागमन, पण कोटींचं नुकसान; दिल्ली कॅपिटल्ससोबत मोठी ट्रेड

Mulshi News : दुष्काळग्रस्त असलेल्या तालुक्यांच्या यादीतून मुळशी तालुका वगळला; तालुक्यातील शेतकरी शासनाविरोधात आक्रमक

गोकुळच्या स्टेजवर जुना हिशेब? अमर खोत आणि बाबासाहेब असुर्लेकर यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT