नाशिक

स्वामीनारायण मंदीर धुळे

CD
धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन --- फोटो क्रमांक ः 34914 धुळे : देवपूरमधील बीएपीएस श्री स्वामिनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सवानिमित्त भगवान स्वामिनारायण यांना अर्पण करण्यात आलेले पक्वान्न. --- अकराशे पदार्थांचा अन्नकूट महोत्सव स्वामिनारायण मंदिर ः शेतकऱ्यांवरील संकट निवारणासाठी प्रार्थना सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ ः दिवाळीच्या मंगल पर्वानिमित्त देवपूर येथील बीएपीएस श्री स्वामिनारायण मंदिरात पारंपरिक अन्नकूट महोत्सव २०२६ भक्तिमय वातावरणात पार पडला. भगवान स्वामिनारायण यांना अकराशेहून अधिक विविध शाकाहारी पक्वान्न व खाद्यपदार्थांचा भव्य महानैवेद्य अर्पण करण्यात आला. शहर व परिसरातील सुमारे दहा हजार भाविकांनी या सोहळ्याच्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. भगवान श्रीकृष्णांच्या काळापासून सुरू असलेली अन्नकूट महोत्सवाची परंपरा बीएपीएस स्वामिनारायण संप्रदायात गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळ श्रद्धेने जपली जात आहे. याच परंपरेनुसार संत आणि शेकडो भाविकांनी शुद्धता व पवित्रता जपत विविध पक्वान्ने तयार करून परमेश्वराच्या चरणी अर्पण केली. महोत्सवादरम्यान संत श्री आनंदजीवन स्वामी यांच्या हस्ते गोवर्धन पूजन व मुख्य आरती झाली. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊन त्यांना सुखाचे दिवस यावेत, तसेच महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊन संपूर्ण देश व विश्वात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी विशेष प्रार्थना करण्यात आली. भक्ती, सेवा, समर्पण आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर चैतन्यमयी वातावरण होते. संत आनंदजीवन स्वामी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत जय स्वामिनारायण, जय महाराष्ट्र, असा संदेश भाविकांना दिला. --- १४-१ कोट फोटो क्रमांक ः 34917 अन्नकूट म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची सजावट नसून, परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भारतीय संस्कृतीतील अनोखी परंपरा आहे. ‘अन्न हेच पूर्णब्रह्म’ या भावनेतून भगवंताला अर्पण केलेले अन्न प्रसादरूपाने पुन्हा भक्तांना मिळते. देवाला अर्पण केलेले कधीही कमी होत नाही, तर त्यातून भक्तांना आशीर्वाद आणि समाधान मिळते. - आनंदजीवन स्वामी, संत, श्री स्वामिनारायण मंदिर, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

IRCTC Shimla-Manali Winter Special Tour Package : नोव्हेंबरच्या अखेरीस शिमला-मनाली फिरण्याची सुवर्णसंधी; IRCTC कडून 'विंटर स्पेशल टूर पॅकेज' जाहीर, टॉय ट्रेनचा प्रवास ते विमानाची सुविधा एकाच पॅकेजमध्ये

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Pune News : पुणे महापालिका बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT