नाशिक

पदोन्नती आदेश वितरण

CD
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो-NSK26H32188 धुळे : आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह मायादेवी परदेशी, लताबाई पोतदार, नितीन कापडणीस, करुणा डहाळे, डॉ. सोनाली देवरे-पगार, व्ही. एल. दासरवाड आदी. --- आदर्श पुरस्कार, पदोन्नती आदेशांचे वाटप --- धुळे महापालिकेत मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम; मनपा शाळा, शिक्षकांचा सन्मान सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १३ : महापालिकेतील विविध संवर्गांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेशांचे वितरण तसेच सन २०२६- २७ साठी आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कारांचे सोमवारी (ता. १२) महापालिकेत मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. धुळे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात हा कार्यक्रम झाला. महापौर मायादेवी परदेशी, आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, इतर अधिकारी- कर्मचारी, शिक्षक, शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिकेतील विविध संवर्गांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता, अनुभव व सेवाविषयक अभिलेखांच्या छाननीनंतर कर्मचारी पदोन्नती निवड समितीच्या निर्णयानुसार पदोन्नतीची कार्यवाही करण्यात आली. या प्रक्रियेत एकूण ७२ अधिकारी- कर्मचाऱ्यांपैकी ६८ जणांना कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पदोन्नती आदेशांचे वितरण करण्यात आले. महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेल्या सहाय्यक आयुक्त पदासाठीच्या दोन, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदासाठीचे एक व उपअभियंता (स्थापत्य) पदासाठीचे एक अशा एकूण चार अधिकाऱ्यांना संबंधित विषयपत्रे देण्यात आली. ७२ कर्मचारी असे सहाय्यक आयुक्त- २, जनसंपर्क अधिकारी- १, अधीक्षक/ मुख्य लिपिक व समकक्ष संवर्गातील- ९, सहायक सांख्यिकी-, वरिष्ठ सहाय्यक/ स्वीय सहाय्यक/ निरीक्षक व समकक्ष संवर्गातील- ३४, लिपिक- ११, लेखापाल- १, उपलेखापाल- १, रोखपाल/ प्रमुख रोखपाल- १, कार्यकारी अभियंता (स्थापत्य)- १, उपअभियंता (स्थापत्य)- १, संगणक प्रोग्रॅमर- १, सहाय्यक अग्निशमन अधिकारी- १, स्वच्छता निरीक्षक- २, टेलिफोन ऑपरेटर- १ आणि मलेरिया सुपर फिल्ड वर्कर- ४. अशा एकूण ७२ अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. शाळा- शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमात महापालिका शिक्षण मंडळांतर्गत सन २०२६-२७ साठी निवड झालेल्या दोन आदर्श शाळा व पाच शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मराठी माध्यमातून महापालिका शाळा क्रमांक- ९ आणि उर्दू माध्यमातून महापालिका शाळा क्रमांक-२५ यांना प्रथम क्रमांकाचा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आदर्श शिक्षक पुरस्कारांतर्गत मराठी माध्यमातील महापालिका शाळा क्रमांक- ३ येथील उदय बापूराव केदार व उर्दू माध्यमातील महापालिका शाळा- ५३ येथील मुदस्सीर अहमद मुख्तार अहमद यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, उत्तेजनार्थ आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये महापालिका हायस्कूल येथील चंद्रकांत गोकुळ गुरव, महापालिका शाळा क्रमांक-८ येथील शाह मोहम्मद शरीफ व महापालिका शाळा- २५ येथील हुमेरा परवीन मोहम्मद जाफर यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्थापना विभागाचे अधीक्षक संजय मोरे, वरिष्ठ सहाय्यक काळू साबळे, प्रतिक कुंभार, शिक्षण मंडळातील प्रशासन अधिकारी व्ही. एल. दासारवाड, शिक्षक सूर्यवंशी व संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! 'त्या' देशाकडे जाणारी उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

SACHIN YUVRAJ: सचिन तेंडुलकर, युवराज सिंग अन् झहीर खानला संघातून का डच्चू दिला? माजी मुख्य निवडकर्त्याने सांगितलं खरं कारण!

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार यांनी शेतकरी व सभासदांशी साधला संवाद; विजयाबद्दल मानले आभार

नकळत जयच्या मनातील प्रेम ओठांवर येणार! शरूसमोर देणार प्रेमाची कबुली? SANAI CHAUGHADE मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Gandhinagar: अमित शाहांच्या मतदारसंघात काय घडलं? गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?

SCROLL FOR NEXT