नाशिक

ठाकरे सेनेचे ''जोडे मारो'' आंदोलन

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 35351 धुळे : बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ राणा प्रताप चौकात शायना एनसी यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते. -- बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा धुळ्यात निषेध -- राणा प्रताप चौकात ठाकरे सेनेचे जोडे मारो आंदोलन; जोरदार घोषणाबाजी -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे गुरुवारी (ता. १९) सकाळी राणा प्रताप चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख, माजी आमदार अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बाळासाहेबांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, तेच आज त्यांचा फोटो फाडण्याचे धाडस करीत आहेत, अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. - कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. १८) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत वाद निर्माण झाला होता. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, संजय निरुपम, आनंद दुबे यांच्यासह सहा प्रवक्त्यांनी पुस्तकाच्या प्रती आणि पाने फाडून निषेध नोंदवला. या वेळी निषेधासाठी दाखवलेल्या जुन्या फोटोसह पाने फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा धुळ्यात निषेध करण्यात आला. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, निंबा मराठे, कुणाल कानकाटे, मनोज जाधव, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, प्रभादेवी परदेशी, मयुरी सोनवणे, हेमराज पाटील, बाबाजी पाटील, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, मनोज बंब, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, शिवाजी शिरसाळे, मुन्ना पठाण, चंद्रकांत देसले, दिनेश पाटील, संदीप चौधरी, अजय चौधरी, कपिल लिंगायत, पंकज भारस्कर, गजेंद्र पाटील, शांताराम माळी, सागर निकम, आबा हरळ, आबा बडगुजर, सागर साळवे, नीलेश कांजरेकर, संजय पाटील, अमोल ठाकूर, सचिन शिंदे, सोमेश कानकाटे, गुलाब धोबी, योगेश पाटील, जयेश फुलपगारे, तरबेज शेख, संजय पाटील कुंडाणे, अविनाश जोंधळे, सचिन रुणवाल, विरेन पवार, जाकिर शेख, फईम काझी, चेतन शिंपी, दीपक सोनटक्के, कुमोद सोनार, नाना पारधी, राजू पाटील, ईश्वर पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF Rule Change: पीएफचे नियम बदलले! आता 90% रक्कम काढता येणार, फक्त 2 महिन्यांची अट; नोकरदारांना मोठा दिलासा!

PM Kisan Yojana Rules : जमीन वडिलांच्या नावावर अन् शेती चार मुलं करतात; मग, चारही भावांना 'पीएम किसान'चे 6,000 मिळणार की 24,000 रुपये? काय सांगतो सरकारी नियम?

PUC Certificate Validity: तुमच्या गाडीचा PUC किती दिवस वैध राहणार? मुदत संपल्यास काय होणार? केंद्र सरकारचे नवे नियम जाणून घ्या!

'देऊळ बंद' फेम आर्या घारेने बदललं नाव; वडिलांचं नाव अन् आडनावही हटवलं, म्हणाली...

GTA 6 खेळण्यासाठी किती खर्च येणार? प्ले स्टेशन नसेल तरी होईल काम, फक्त २०० रुपये...

SCROLL FOR NEXT