संक्षीप्त
--
दीड लाख रूपयांची
मोहाडीत घरफोडी
धुळे : मोहाडी येथील निवृत्त मुख्याध्यापकासह एकाकडे चोरट्य़ांनी घरफोडी करीत सोने-चांदीचे दागिने आणि रोेकड, असा एकूण एक लाख ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना दोन ते तीन नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी अशोक माधवराव सूर्यवंशी (वय ७२, रा. मोहाडी, ता. धुळे) यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्य़ांनी फिर्यादी व साक्षीदाराच्या घराचे कुलूप तोडून घरासह किराणा दुकानातून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.
-
फटाके फोडण्यावरून
तरुणाला मारहाण
धुळे : फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला मारहाण, धारदार हत्याराने वार करीत जखमी केल्याची घटना देवपूरमध्ये घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद सुभाष राठोड (वय ३०, रा. वलवाडी, इंद्रप्रस्थ सोसायटी, देवपूर, धुळे) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीनुसार त्यास रात्री साडेआठला अनिल जोशी व इतर पाच ते सात अनोळखींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एका संशयिताने त्याच्या जवळील धारदार वस्तूने फिर्यादीच्या डाव्या हातावर तसेच त्यातील एकाने फिर्यादीच्या उजव्या पायावर धारदार वस्तू मारून दुखापत केली.
-
कंपनी आवारातून
१३ हजारांची चोरी
धुळे : अवधान (ता. धुळे) औद्योगिक वसाहतीमधील एमएसपीव्हीएल कंपनीच्या आवारातून १३ हजार रुपये किमतीची ६५० मीटर लांबीची डीसी केबल चोरीला गेली. याप्रकरणी कंपनीचे तंत्रज्ञ सागर पाटील यांच्या फिर्यादीनुसार मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
शेततळ्यात जखमी;
तरुणाचा मृत्यू
धुळे : झंझाळे (ता. साक्री) येथील जितू प्रताप पवार याचा उपचारादरम्यान दहा ऑक्टोबरला मृत्यू झाला. गावातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या जितू याने पाण्यात सूर मारला असता त्याचे डोके दगडावर आपटले. यात मानेचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर धुळे आणि नंतर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सर्पदंश झाल्याने
महिलेचा मृत्यू
धुळे : शेणपूर (ता. साक्री) शिवारातील मळ्यातील घरात झोपलेल्या वजाबाई रोहिदास माळी (वय ५५) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. आठ ऑक्टोबरला रात्री दोनच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाला. पहाटे हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
चितोडला पोलिसांना
धक्काबुक्की; गुन्हा दाखल
धुळे : शहरालगत चितोडमधील दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी धक्काबुक्की व दमदाटी केल्याचा प्रकार घडला. तसेच सरकारी कामात अडथळा आणून हुल्लडबाजी केल्याप्रकरणी तीन जणांसह अन्य दोन ते तीन अनोळखींविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना चार नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. याबाबत हवालदार आकाश आव्हाड यांच्या फिर्यादीनुसार आकाश उर्फ आकड्या (पूर्ण नाव नाही), सागर बैसाणे याच्यासह तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक सतीश कोठावदे तपास करीत आहेत.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.