नाशिक

११ लाखांचा ऐवज चोरीला

CD
धुळे ः टुडे ३ साठी --- अकरा लाखांचा ऐवज चोरीला जिल्ह्यात दोन दिवसांत तीन घरफोड्या सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ ः सोनगीर (ता. धुळे), पिंपळनेर (ता. साक्री) आणि धुळे शहरात दोन दिवसांत झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह ११ लाख १३ हजार १०० रुपयांचा ऐवज नेला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. सोनगीर येथील बालाजीनगर परिसरात गुरुवारी (ता. ८) रात्री ते पहाटेच्या सुमारास घरफोडी झाली. दिनेश शांताराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून २० हजार रुपये रोख, ४५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि सहा हजार ५०० रुपयांच्या चांदीच्या जोडव्या व साखळ्या, असा एकूण ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पिंपळनेर (ता. साक्री) येथील सटाणा रोड परिसरात गुरुवारी (ता. ८) सकाळी अकरा ते दुपारी साडेबारादरम्यान घरफोडी झाली. माधुरी सागर जाधव (रा. साईबाबा कॉलनी) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने, ३६ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने आणि १२ हजारांची रोकड, असा एकूण पाच लाख ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज नेला. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेनगर येथील शिव वसंत अपार्टमेंटमध्ये ७ ऑक्टोबरला दुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास घरफोडी झाली. छायाचित्रकार प्रणय राजेंद्र खंडेलवाल यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह चार लाख ५३ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

SCROLL FOR NEXT