धुळे ः टुडे २ साठी
---
फोटो क्रमांक ः 34971
धुळे : बसस्थानकातील गैरसोयींबाबत वरिष्ठ आगारप्रमुख संदीप निकम, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा याना निवेदन देताना शिवसेनेचे संजय वाल्हे व कार्यकर्ते.
---
बसस्थानक ठरतेय गैरसोयींचे आगार
सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांचे हाल; शिवसेनेकडून निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने शेजारील मैदानावर तात्पुरते बसस्थानक हलविण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ आगारप्रमुख संदीप निकम आणि विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांना घेराव घालत तात्पुरत्या बसस्थानकाची पाहणी करून निवेदन दिले.
तात्पुरत्या बसस्थानक परिसरात बसच्या सततच्या ये-जामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिणामी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याच्या रुग्णांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच रात्रीच्या वेळी परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. त्यातच सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरी, छेडछाड यांसारख्या अनुचित प्रकारांची भीती व्यक्त होत असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
१४-१
आंदोलनाचा इशारा
या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसणे आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व प्रसाधनगृहाचा अभाव असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. या पार्श्वभूमीवर मैदानावर दिवसातून तीन ते चार वेळा टँकरद्वारे पाणी मारावे, रात्रीसाठी हायमास्ट किंवा एलईडी दिवे लावावेत, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, पिण्याच्या पाण्याची व महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय करावी, तसेच प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन जादा बस सोडाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना महानगरप्रमुख संजय वाल्हे, आबा कदम, डिगंबर चौधरी, विष्णू जावडेकर, मिलिंद चौधरी, प्रफुल्ल सोनवणे, किरण आगलावे, सतीश काळे, समाधान कुंमरे, बबलू शेख, अस्लम खाटीक, शुभम जगदाळे, हेमंत घटे, अजय जगदाळे, सागर देवरे, गणेश शिंदे, शरद गोसावी, प्रतीक शिंदे, आबा सैंदाणे, विजय देवरे, देवेंद्र गायकवाड, पंकज नगराळे, दिनेश चव्हाण, चेतन भारती, स्वप्नील मोरे, हरी मोरे, विकी मोरे आदींनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.