धुळे : टुडे पान २ साठी....
--
फोटो क्रमांक : 33900
दोंडाईचा : शहर व जिल्ह्यातील बसथांब्यांवर पिकअप शेड उभारावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना देताना ‘मी धुळेकर’ संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल.
--
जिल्ह्यात बसथांब्यांवर पिकअप शेड उभारा
--
‘मी धुळेकर’ संघटनेची पालकमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : शहर व जिल्ह्यातील विविध प्रमुख आणि विनंती बसथांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बैठक व्यवस्था व छतासह पिकअप शेड उभारण्यात यावे, अशी मागणी ‘मी धुळेकर’ संघटनेतर्फे केली आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वात पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देण्यात आले.
धुळे शहर हे तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर वसलेले असून, जिल्ह्याचे महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील मुख्य स्थानकासोबतच हजारो व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्ग दैनंदिन प्रवासासाठी विविध विनंती बसथांब्यांचा वापर करतात. मात्र, बहुतांश थांब्यांवर बसण्याची योग्य सोय किंवा ऊन- पावसापासून संरक्षण देणारे शेड नसल्याने प्रवाशांना तासनतास उन्हात व पावसात उभे राहावे लागते. या समस्येचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सहन करावा लागतो अशी खंत निवेदनात व्यक्त केली. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धुळे शहर व जिल्ह्यात बसथांब्यांवर शेडची सुविधा अपुरी असल्याचेही संघटनेने निदर्शनास आणून दिले. प्रवाशांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी तातडीने निधी मंजूर करून आवश्यक सुविधांसह पिकअप शेड उभारण्याची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष भतवाल, छोटू पोतदार, संजय सरदार, किशोर बोरसे, फरदीन शेख, आफ्रिदी शेख, सलमान पठाण आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.