नाशिक

धुळे समर्थकांची धाड

CD
फोटो क्रमांक ः 34519 धुळे : पारोळा रोडवरील बाजार समितीत बेकायदेशीरपणे कोंबलेल्या गोवंशाची सुटका केल्यानंतर उपस्थित पोलिस निरीक्षक विनोद पाटील, विकी परदेशी, ॲड. रोहित चांदोडे व समर्थक. --- धुळे बाजार समितीतून गोवंशाची सुटका --- गोरक्षक अन् लोकप्रतिनिधी समर्थकांची धाड; पोलिसांकडून नियंत्रण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : वसूबारस आणि दिवाळीच्या तोंडावर कत्तलीच्या उद्देशाने वाहनांमध्ये दाटीवाटीने कोंबून ठेवलेल्या सुमारे १०० ते १५० गोवंशाची सुटका करण्यात गोरक्षक आणि लोकप्रतिनिधी समर्थकांना यश आले. मंगळवारी (ता. ४) रात्री आठ ते दोनदरम्यान येथील पारोळा रोडवरील बाजार समितीच्या आवारात ही धडक कारवाई करण्यात आली. बाजार समितीचा मंगळवारी नियमित बाजाराचा दिवस होता. आवारात उभ्या असलेल्या ३ ते ४ संशयास्पद वाहनांमध्ये इअर टॅग (अधिकृत नोंदणी) नसलेले गोवंश कोंबल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले. याबाबत गोरक्षक रोहित विभांडीक, प्रणिल मंडलीक, अक्षय चौधरी, अक्षय हाके यांनी तत्काळ आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात भाजपचे विकी परदेशी, नगरसेवक ॲड. रोहित चांदोडे, चिरायू अग्रवाल, मोहन टकले, किरण अहिरे, संतोष परदेशी, अमोल सूर्यवंशी, अमित भोसले, पुक्या साळवे, भटू ठाकरे, नितीन शिंदे व कार्यकर्त्यांची टीम रात्री आठला बाजार समितीत पोहोचली. पोलिसांचा बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून विकी परदेशी यांनी आझादनगर पोलिस ठाण्याला बाजार समितीमधील स्थितीची पूर्वकल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक विनोद पाटील ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गोरक्षक आणि कार्यकर्ते दाखल होताच व्यापारी व संशयित कसाई वाहने सोडून पसार झाले. बाजार समिती प्रशासनाकडे या बेकायदेशीर गोवंशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. वाहनात कोंबलेल्या सर्व गोवंशाची सुटका करून त्यांची रवानगी सुरक्षितपणे स्थानिक गोशाळेत करण्यात आली. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. वसूबारसपूर्वीच गोवंशाला जीवदान मिळाल्याने शहरातील गोभक्तांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT