नाशिक

बैलजोडी चोरणारे तिघे गजाआड

CD
धुळे ः टुडे ३ साठी -- फोटो क्रमांक ः 34153 नरडाणा : पोलिस ठाण्यासमोर मुद्देमालासह पकडलेले संशयित. शेजारी कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार. -- बैलजोडी चोरणारे तिघे गजाआड - नरडाणा पोलिसांची कारवाई; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : शेतकऱ्याच्या घरासमोरील शेडमधून बैलजोडी चोरून ती परजिल्ह्यातील गुरांच्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांच्या आंतरजिल्हा टोळीचा नरडाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिन्ही संशयितांना गजाआड करून त्यांच्याकडून बैलजोडी विक्रीचे ३५ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले तीन लाखांचे पिकअप वाहन, असा एकूण तीन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथील शेतकरी मुकेश युवराज पाटील यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमधून ११ ऑक्टोबरलाला एक ते पहाटे चारच्या दरम्यान चोरट्यांनी बैलजोडी लांबवली होती. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करत असताना ३० ऑक्टोबरला सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित रुपेश भरत पाटील (वय २७, रा. होळ, ता. शिंदखेडा) व मनिष रमेश पाटील (वय ४६, रा. वारुड, ता. शिंदखेडा) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या कसून चौकशीत त्यांनी साथीदार महेंद्र दादाभाऊ भोई (वय ३८, रा. एकतास, ता. अमळनेर, जि. जळगाव) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरांनी ही बैलजोडी पिकअप वाहनातून (एमएच ०४ जीआर ८३६३) नेऊन जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी-वाकवद येथील गुरांच्या बाजारात विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी रोख ३५ हजार रुपये व गुन्ह्यातील वाहन हस्तगत करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आव्हाळ, पोलिस अंमलदार अनारसिंग पवार, ललित पाटील, रविंद्र मोराणीस, भरत चव्हाण, राकेश शिरसाठ, गणेश पाटील, नारायण गवळी, योगेश गिते, विक्रांत देसले, चंद्रकांत साळुंखे, धनेश कुंकारी, विजय माळी, प्रशांत पाटील, अर्पण मोरे, विनोद कोळी, सचिन बागूल, अजय सोनवणे, सुरजकुमार सावळे आणि होमगार्ड जितेंद्र रणदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

IND vs NZ, 5th T20I: शेवटचा सामन्यात होणार मोठे प्रयोग? वैभव सूर्यवंशी, कुलदीपला मिळणार Playing XI मध्ये संधी?

Marathi News Live Updates : गोकुळ दूध संघातर्फे उत्पादकांना ११७ कोटींची 'दिवाळी भेट'; अंतिम दूध दर फरक थेट बँक खात्यात जमा

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Foreign Deputy PM daughter Bollywood Ambition : "ते नेते माझ्या मागेच लागलेत!"; जगातील 'त्या' बलाढ्य देशाच्या उपपंतप्रधानांच्या मुलीला काम करायचंय बॉलिवूडमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा खुलासा

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT