नाशिक

बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

CD
धुळे : टुडे पान १ साठी.. अँकर -- लोगो छायाचित्र क्रमांक : 32505 -- लहानग्यांच्या डोळ्यांत फुलणार निरोगी उद्याची स्वप्ने! -- धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४२८ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया; ४३ जणांना नवदृष्टी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : डोळ्यांच्या आजारांमुळे अंधुक झालेल्या लहानग्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाशाची नवी पहाट आणण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष प्रयत्न केले जात आहेत. एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ४२८ बालकांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, आणखी ४३ बालकांना या मोफत उपचारांतून नवी दृष्टी मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांमधील दृष्टीविषयक समस्या दूर करून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. एप्रिलपासून आतापर्यंत २७ बालकांवर डोळ्यांतील तिरळेपणासाठी, तर ४०१ बालकांवर मोतीबिंदूसाठी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. या उपचारामुळे लहानग्यांचे निरोगी बालपण पुन्हा आकारास येत आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत १३ ऑक्टोबरला जिल्हा रुग्णालय येथील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात विशेष नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक येथील तज्ज्ञ पथकाच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात ११३ बालकांची नेत्रतपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके यांच्या मार्गदर्शनात पार पडले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, डॉ. समीर शेख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जाधव, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे पथक आणि ‘डीईआयसी’ केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रत्येक बालकाला निरोगी दृष्टी आणि आनंदी बालपण मिळवून देण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. - १४-१ ..चौकट.. १४-१ ४३ बालकांवर उपचार तपासणीत ११३ पैकी ४३ बालकांना डोळ्यांवरील शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व ४३ बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे गरजू कुटुंबांवरील उपचाराचा आर्थिक भार हलका होणार आहे. बालवयात तिरळेपणा किंवा मोतीबिंदूसारख्या आजारांचे वेळेवर निदान होणे गरजेचे असते. योग्य वेळी उपचार मिळाल्यास मुलांच्या दृष्टीसोबतच त्यांचे शिक्षण, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासाला मोठे बळ मिळते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या डोळ्यांशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT