नाशिक

दुष्काळग्रस्तांसाठी जिल्हा बँकेची पाच लाखांची मदत

CD
NSK26H31366 धुळे : जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पाच लाखांचा धनादेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करताना बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे. ---------------- दुष्काळग्रस्तांसाठी जिल्हा बँकेची पाच लाखांची मदत संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांच्या वतीने धनादेश सुपूर्द सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ४ : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रविवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धुळे दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्यासह पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते हा पाच लाख रुपयांचा धनादेश मंत्री बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी हे देखील उपस्थित होते. या मदतीमध्ये बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीचा भत्ता, तसेच बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या एका दिवसाच्या पगाराचा समावेश आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा बँकेने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT