नाशिक

३० कोटी बनावट नोटा

CD
धुळे ः टुडे १ साठी.....मास्क हेडला नेव्हीगेशन करणे.... -- ३० कोटींच्या बनावट नोटांची निव्वळ अफवा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : धुळे तालुक्यात ३० कोटी रूपयांच्या बनावट नोटा सापडल्या असून, तालुका पोलिस ठाण्याकडून संशयितांची चौकशी केली जात असल्याची चर्चा जिल्ह्यात बुधवारी (ता. २१) उसळली. नागमणी (बनावट प्रकार), दुतोंडी मांडूळ तस्करीमुळे देशातील बहुचर्चित अजनाळे (ता. धुळे) येथे हा प्रकार उजेडात आला असून एकाची चौकशी केली जात असल्याचीही चर्चा होती. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सांगितले, की ३० कोटींच्या बनावट नोटा आढळल्याची निव्वळ अफवा आहे. ती संबंधित गावातूनच उठविण्यात आली. परंतु, सोशल मीडियावर बनावट नोटांबाबत पोस्ट व्हायरल झाल्यामुळे या अफवेला खतपाणी मिळाले. प्रत्यक्षात अशा कुठल्याही बनावट नोटा आढळलेल्या नाहीत. अजनाळे येथील एका चव्हाण नामक संशयिताला एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याशी निगडीत ही अफवा पसरविण्यात आल्याची चर्चा विविध पातळीवरून होत होती. -- सट्टा अड्ड्यावर छापा; तीन संशयित ताब्यात धुळे, ता. २१ : शहरातील पाच कंदील परिसरातील सट्टा अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आठ हजार ५७० रुपये रोख आणि कल्याण सट्ट्याचे पुस्तक जप्त केले. शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात पाच कंदिलामागील एका बोळीत पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या ठिकाणी कारवाई केली. पोलिसांना पाहून काही जण पळून गेले. मात्र, सट्टा चालविणाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतले. याबाबत हवालदार हिमांशू ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार किरण बन्सीलाल सोनार (रा. क्रांतीनगर, विद्यावर्धिनी महाविद्यालयामागे), लक्ष्मण सटवाजी गवळी (रा. गोकुळनगर, शासकीय दूध डेअरीमागे) आणि अजित बाबुराव राणा (सट्टा अड्ड्याचा मालक, रा. गल्ली क्रमांक २, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

Latest Marathi News Live Update : शेतातून सोयाबीनची २० पाेती लंपास, ४८ हजारांचा माल चोरीला

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

SCROLL FOR NEXT