नाशिक

गुन्ह्याच्या कटाचा संशय

CD
धुळे ः टुडे ३ साठी, मेन --- फोटो क्रमांक ः ३१८३२ किंवा ३१८३३ --- चौघांकडून गुन्ह्याच्या कटाचा संशय धुळ्यात दोन गावठी कट्टे, पाच काडतुसे जप्त; कसून तपास सुरू सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ ः शहरातील चाळीसगाव रोडवरील चौफुलीजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी संशयित करण दीपक ब्राह्मणे (वय ३१, रा. हेरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. ८५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या शस्त्रांचा वापर गंभीर गुन्ह्यासाठी करण्याचा कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी गुरुवारी (ता. ८) भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये कट रचणे, चिथावणी देणे आणि खोटी माहिती देण्यासंबंधीची वाढीव कलमे लावण्यात आली. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार, तसेच धुळे शहरातील अलीकडील गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एलसीबीचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधात कारवाई सुरू केली. त्यातून ५ ऑक्टोबरला मिळालेल्या माहितीच्या आधारे करण ब्राह्मणे याला शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत शस्त्रे उमर्टी (मध्य प्रदेश) येथून खरेदी केल्याची माहिती करण याने दिल्याचे सांगण्यात आले. शस्त्रांच्या वाहतुकीसाठी उसाटणे (कल्याण) येथील हरिभाऊ ऊर्फ हरिदास राम पाटील याने ७० हजार रुपये दिले. शस्त्रे पोहोचवल्यानंतर आणखी ३० हजार देण्याचे ठरल्याचे त्याने सांगितले. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि पुढील चौकशीत हरिभाऊ ऊर्फ हरिदास राम पाटील हे नाव खोटे असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात ब्राह्मणे याच्यासह कृष्णा नामक तरुण, सागर अनंता तवले (रा. बालेगाव, जि. ठाणे) आणि स्वप्नील पारधे याचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चौघांनी संगनमताने गंभीर गुन्हा करण्याचा कट रचल्याचा संशय आहे. सागर तवले याच्याविरुद्ध यापूर्वी ठाणे शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये, डायघर पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये आणि हिललाइन पोलिस ठाण्यात २०२६ मध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक वारे, सहायक निरीक्षक दीपक ढोके, उपनिरीक्षक अमित माळी, सदेसिंग चव्हाण, योगेश चव्हाण, संदीप पाटील, मुकेश वाघ, जितेंद्र अहिरराव, नरेंद्र गिरासे, आशिष वानखेडे, सुशील शेंडे, विवेक वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

Maharashtra Live News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे आंदोलन; १० खासदार राष्ट्रपतींच्या भेटीला

NCP Expulsion : बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; विद्यमान अध्यक्षांवर तडकाफडकी कारवाई

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

SCROLL FOR NEXT