धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त व हेड मास्क
--
सासूला मारहाण;
सात जणांवर गुन्हा
धुळे : वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला का बोलावले नाही, असा जाब विचारत सुनेसह तिच्या नातलगांनी सासूला मारहाण केल्याची घटना साक्री रोड परिसरात घडली. याप्रकरणी पुष्पा बबन चव्हाण (रा. श्रीनगर, चितोड रोड, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार त्यांची सून वैशाली पंकज चव्हाण (रा. साक्री रोड, धुळे), पूजा पवार (रा. ताडेपुरा, अमळनेर), सुनील बापू सोनवणे, सोनल चव्हाण, बापू सोनवणे, सुनील सोनवणे यांची पत्नी आणि वैजयंता बापू सोनवणे (सर्व रा. नवापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यात ३१ ऑक्टोबरला सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत संशयितांनी पुष्पा चव्हाण यांना शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-
बियर नाकारल्याने
चालकाला मारहाण
धुळे : फुकट बियर देण्यास नकार दिल्याच्या रागातून बियर शॉपी चालकाला दगडाने मारहाण करून त्याच्या गळ्यातील दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओमपान हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी दत्तू राजेंद्र पाटील आणि मधुकर ऊर्फ संदीप राजेंद्र निकम (दोघे रा. महिंदळे) याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एकाला अटक झाली आहे. कुंडाणे- वार येथील सचिन बापू पाटील (वय ३२) यांच्या बियर शॉपीवर दिवाळीनिमित्त साफसफाई सुरू असताना दत्तू पाटील याने दगड हातात घेऊन फुकट बियरची मागणी केली. नकार दिल्याने त्याने शिवीगाळ करून दुकान फोडण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. नंतर तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना मधुकर ऊर्फ संदीप निकम याने सचिन पाटील यांना रस्त्यात अडवून दगडाने मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याचे ओमपान हिसकावून नेले.
-
मुलावर अत्याचार;
संशयिताविरुद्ध गुन्हा
धुळे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथे अल्पवयीन मुलाला शेतात नेऊन पाण्याच्या हौदात अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार संशयित मझहर अजीज शाह फकीर (रा. डालडा घरकुल, दोंडाईचा) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. संशयिताने अल्पवयीन मुलाला शनिवारी (ता. ७) सायंकाळी घराजवळील शेतात नेले. तेथे धाक दाखवून पाण्याच्या हौदात उतरवित त्याच्यावर अत्याचार केला. ही बाब पालकांना समजताच संशयिताने तेथून पळ काढला.
-
गळफास घेतल्याने
तरुणाचा मृत्यू
धुळे : मोरदड (ता. धुळे) येथे समाधान भुला चव्हाण (वय ३०) या तरुणाचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला. घरातील सदस्य झोपेत असताना शनिवारी (ता. ७) पहाटे त्याने घरात गळफास घेतला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
तापीत आढळला
एकाचा मृतदेह
धुळे : तापी नदीत बुडाल्याने सुभाष भाइदास खैरनार (वय ४५, रा. चौगाव, ता. शिंदखेडा) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. सुकवद शिवारातील तापी नदी पुलावर गुरुवारी (ता. ५) सकाळी चपला आढळल्या. नदीत पाहणी केली असता एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.