नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- दोन पिस्तुलांसह संशयित ताब्यात धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीजवळ स्थानिक गुन्हा शाखेने कारवाई करून संशयित दीपक ब्राह्मणे (रा. हेरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. याबाबत पोलिस कर्मचारी विवेक वाघमोडे यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. -- कुटुंबाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा धुळे : घरासमोर येऊन शिवीगाळ करत महिलेसह कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कल्याणी गावडे, सचिन गावडे, दत्तात्रय मिंड, कुणाल मिंड, यश गावडे (सर्व रा. चक्रधरनगर, मोहाडी) अशी संशयितांची नावे आहेत. तीन ऑक्टोबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. शिवीगाळ करू नका, असे सांगितल्याच्या रागातून संशयितांनी गोंधळ घालत महिलेसह तिचे पती, जेठ, सासू व दीर यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत महिला व तिच्या जेठाला दुखापत झाली. -- महिलेला शिवीगाळ; एकाविरुद्ध गुन्हा धुळे : राजबाई शेवाळी (ता. साक्री) येथे बचत गटाची बैठक घेण्यावरून महिलेला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात महेंद्र शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. किरण शिंदे यांच्या घरासमोर चार ऑक्टोबरला रात्री नऊच्या सुमारास महिला बचत गटाची बैठक सुरू होती. एवढ्या रात्री बैठक का घेतली, असे म्हणत महेंद्र शिंदे याने किरण यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. -- हॉटेल फोडून साहित्याची चोरी धुळे : अलाणे (ता. शिंदखेडा) येथे हॉटेलचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह फ्रिज, असा ४९ हजारांचा ऐवज नेला. संग्रामसिंग कोमलसिंग गिरासे यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये चार ऑक्टोबरला मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील सात हजार रुपये व फ्रिज नेला. याबाबत गिरासे यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. -- दुचाकी अडवली; शरीरसुखाची मागणी धुळे : शहरातील रेल्वेस्थानक परिसरातून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या ३४ वर्षीय विवाहितेला अडवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित व्यंकटेश निंबाळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पाच ऑक्टोबरला सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास संशयिताने महिलेची दुचाकी अडवून तिचा हात पकडला. तसेच अश्लील हावभाव करून शरीरसुखाची मागणी केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. -- कोमात असलेल्या तरुणाचा मृत्यू धुळे : वणी (ता. धुळे) येथील योगेश बापू पाटील (वय ३१) याचा अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर नऊ महिन्यांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नऊ जानेवारीला योगेश दुचाकीने (एमएच १८- १८८४) शेताकडे जात असताना भरधाव दुचाकीने (एमएच १८ बीवाय ०८४८) त्याला धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेला योगेश तेव्हापासून कोमात होता. त्याच्यावर देवपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली. -- पुरमेपाडा तलावात पुरुषाचा मृतदेह धुळे : पुरमेपाडा (ता. धुळे) येथील वनहद्दीतील तलावात सुमारे ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. हा पुरुष अंघोळीसाठी तलावात उतरला असावा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT