नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त...........मास्क हेडसह -- वीज तार चोरीला; २० हजारांचे नुकसान धुळे : नरव्हाळ (ता. धुळे) शिवारातील शेतात उभ्या खांब्यावर लावलेली वीज महावितरण कंपनीची २७४ किलो वजनाची तार चोरीला गेली. हा प्रकार उघडकीस आला. चोरीस गेलेल्या तारेची किंमत २० हजार ५५० रुपये आहे. याप्रकरणी कंपनीचे अभियंता उमाकांत खैरनार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. - छेडखानीवरून हाणामारी; दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा धुळे : मुलीच्या छेडखानीच्या कारणावरून वसमार (ता. साक्री) येथे दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी साक्री पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या. २९ सप्टेंबरला सायंकाळी एका ४० वर्षीय महिलेच्या घराजवळ दोघांनी येऊन ‘तुमची मुले माझ्या मुलीकडे बघतात,’ असे म्हणत शिवीगाळ केली. मुलांना मारहाण करून काठीने डोक्यात दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुसऱ्या गटातील ३९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारल्यावर दोघांनी शिवीगाळ करून हाताबुक्क्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - विनयभंगप्रकरणी ११ जणांवर गुन्हा धुळे : प्रतापपूर (ता. साक्री) शिवारात शेतीच्या वादातून महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली. दुपारी ४० वर्षीय महिला शेतात काम करीत असताना ठाकरे नामक परिवारातील ११ जणांनी (सर्व रा. साक्री) शेतात प्रवेश केला. शेतीच्या वादातून त्यांनी महिलेला व तिच्या मुलाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी महिलेचा विनयभंग केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या घटनेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत मातीमध्ये गहाळ झाली. महिलेच्या फिर्यादीनुसार साक्री पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - गळफास घेतल्याने तरुणाचा मृत्यू धुळे : पाष्टे (ता. शिंदखेडा) शिवारात तरुणाचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनील मोतीलाल भिल (वय ३०, रा. पाष्टे, ता. शिंदखेडा) असे त्याचे नाव आहे. सुनील चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतात पाहिले असता तो आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला नरडाणा आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत नरडाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Earthquake : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका पक्षात उभी फूट! १२ पैकी ८ आमदार भाजपच्या गोटात; विधानसभेतील समीकरणे बदलली!

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

IND vs WI 5th T20I: ५-५ षटकांचा सामना? पावसाचा धुमाकूळ... किती वाजता टॉस, मॅचची वेळ... घ्या जाणून Cut off टाईम...

VIDEO : सरप्राइज देण्यासाठी अचानक घरी पोहोचली लेक; आईची प्रतिक्रिया पाहून नेटकरीही भावूक

SCROLL FOR NEXT