नाशिक

धुळ्यात लुटीच्या घटना

CD
धुळे ः टुडे १ साठी -- धुळ्यात ७० हजारांची लूट; मैंदाण्यात दागदागिने लंपास जिल्हा पोलिस दलापुढे तपासाचे आव्हान --- किंवा मैंदाणेत दिवसा दागदागिने लंपास सव्वादोन लाखांची लूट; धुळ्यातही ७० हजारांची लूट सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ ः शहरात वर्कशॉपचे कुलूप तोडून ७० हजारांची रोकड, तर मैंदाणे (ता. साक्री) येथे भरदिवसा दोन लाखांहून अधिकचा ऐवज लंपास करण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील होंडा शोरूमजवळ असलेल्या इंजिनिअरिंग बी. टी. वर्कशॉपमध्ये १२ ते १३ नोव्हेंबरदरम्यान चोरीची घटना घडली. चोरट्यांनी वर्कशॉपचे मुख्य कुलूप, तसेच आतील गुदामातील कपाट आणि तिजोरीचे लॉक तोडून ७० हजार रुपयांची रोकड लांबविली. याप्रकरणी अरुण मंडू वाघ (वय ६२, रा. मुकुंद कोळवलेनगर, मालेगाव रोड, धुळे) यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार लोहार तपास करीत आहेत. पिंपळनेर पोलिस ठाणे मैंदाणे येथे १३ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसात यादरम्यान घरफोडीची दुसरी घटना घडली. अनिल राजाराम खैरनार (वय ५०, रा. मैंदाणे, ता. साक्री) यांच्या बंद घराची कडी-कोंडा आणि दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून एक लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ७० हजार रुपयांची रोकड, असा एकूण दोन लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी खैरनार यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

SCROLL FOR NEXT