धुळे : टुडे पान ३ साठी...
---
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
चिपळूण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी २८ खेळाडूंची निवड
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : वारूड (ता. शिंदखेडा) येथील जवाहर नूतन विद्यालयाच्या वतीने, धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ३७ व्या जिल्हास्तरीय किशोर-किशोरी मुले-मुली कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत मुलांचे १८ व मुलींचे सहा, असे एकूण २४ संघ सहभागी झाले. यातून मुलांचे १४ व मुलींचे १४ अशा एकूण २८ खेळाडूंची निवड करण्यात आली. हे संघ १ ते ३ डिसेंबर दरम्यान चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेसाठी जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे तांत्रिक व निवड समिती नियुक्त करण्यात आली होती. निवड समितीमध्ये प्रा. डॉ. भालचंद्र मोरे, अखिल शेख, जितेंद्र ठाकरे यांनी काम पाहिले. तर महेंद्र राजपूत उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुलाब बेहरे, संस्थेचे सचिव भालेराव बेहरे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मुजफ्फर अली सय्यद उपस्थित होते. श्री क्रीडा मंडळचे अध्यक्ष यश बेहेरे, उपाध्यक्ष हेमंत भदाणे, सचिव चेतन बिऱ्हाडे यांच्यासह जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच, कार्यकर्ते, जवाहर नूतन विद्यालयाच्या शिक्षकांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.