नाशिक

धुळे जिल्हा परिषद निवडणूक

CD
धुळे ः टुडे ३ साठी, मेन -- धुळ्यात १६८ जागांसाठी कसब पणाला -- जिल्हा परिषद, पंंचायत समिती निवडणूक; प्रशासकीय राजवटीची अखेर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि पंचायत समित्यांचे ११२ गण, अशा एकूण १६८ जागांसाठी राजकीय वातावरण तापणार असून नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांचे कसब पणाला लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह महायुती, महाविकास आघाडीतील घटक पक्षांची राजकीय कसोटी लागणार आहे. - यंदाची निवडणूक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे प्रचारात स्थानिक प्रश्नांना विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई, रस्ते, सिंचन, शेतीमालाचे नुकसान, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि ग्रामीण विकास हे प्रमुख मुद्दे असतील. पालकमंत्री जयकुमार रावल, शिरपूरस्थित आमदार अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, तसेच माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दरम्यान, गेल्या एक वर्ष नऊ महिन्यांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. - दिवाळीनंतर धुराळा जिल्हा परिषदेतील सत्तेचा कार्यकाळ १६ जानेवारी २०२५ ला संपला होता. त्यानंतर १९ जानेवारी २०२५ पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला. तेव्हापासून लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासनाच्या माध्यमातून कारभार सुरू होता. निवडणुकीची प्रतीक्षा लांबल्याने ग्रामीण भागातील राजकीय हालचालींनाही मर्यादा आल्या होत्या. निवडणुकीची चाहूल लागताच अनेक इच्छुकांनी मागील वर्षापासूनच तयारी सुरू केली होती. मतदारांशी संपर्क, स्थानिक प्रश्नांची मांडणी आणि पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणूक प्रक्रिया रखडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला होता. आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने पुन्हा राजकीय हालचालींना वेग येणार आहे. दिवाळीनंतर ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडण्याची चिन्हे आहेत. - खुल्या प्रवर्गातील जागा जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षणाचा मुद्दा राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे मिळून आरक्षण ४८ टक्के असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेत इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केवळ दोन टक्के आरक्षणाची तरतूद होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या प्रवर्गासाठी दोन जागा उपलब्ध होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. उर्वरित जागांचे खुल्या प्रवर्गात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या अंतिम सोडतीनंतरच प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे लक्ष आरक्षण प्रक्रियेकडे लागले आहे. कोणता गट कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतो, यावर अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. काही ठिकाणी विद्यमान राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही आहे. - भाजपपुढे गटबाजीचा प्रश्‍न मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेत ३९ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव महत्त्वाचा ठरला होता. मात्र, त्यानंतर पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजीचे मुद्दे पुढे आले आहेत. काही ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत मतभेद, नाराज इच्छुक आणि संभाव्य बंडखोरी यांचा परिणाम निवडणुकीतील जागावाटपावर होऊ शकतो. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांकडून स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणीचे प्रयत्न सुरू होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र कसे ठरते, याकडेही लक्ष राहणार आहे. - स्थानिक समीकरणांची कसोटी साक्री तालुक्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक संघटन महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपमध्येही इच्छुकांची संख्या आणि अंतर्गत गटबाजी यामुळे उमेदवारी निश्चित करताना पक्षनेतृत्वाची कसोटी लागणार आहे. स्थानिक नेतृत्व, गावपातळीवरील संपर्क आणि विकासकामांचा लेखाजोखा या मुद्द्यांना महत्त्व मिळेल. धुळे ग्रामीण मतदारसंघातही राजकीय गटबाजीचा मुद्दा चर्चेत आहे. आमदार राम भदाणे आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्यातील राजकीय स्पर्धेचे पडसाद जिल्हा परिषद निवडणुकीत उमटण्याची शक्यता असेल. त्यामुळे या भागातील उमेदवार निवड आणि पक्षीय रणनीतीकडे लक्ष राहणार आहे. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शेती आणि मूलभूत सुविधांचे प्रश्नही प्रचारात केंद्रस्थानी येतील. - १४-१ ...चौकट... १४-१ जिल्हा परिषद : पक्षीय बलाबल पक्ष...................जागा भाजप.................३९ काँग्रेस................०७ शिवसेना..............०४ राष्ट्रवादी काँग्रेस.......०३ अपक्ष.................०३ एकूण..................५६ .......... १४-१ ...चौकट... १४-१ पंचायत समिती : पक्षीय बलाबल साक्री पंचायत समिती पक्ष.................जागा भाजप................१२ काँग्रेस...............१० शिवसेना............०३ राष्ट्रवादी काँग्रेस.....०४ अपक्ष...............०५ एकूण...............३४ .......... धुळे पंचायत समिती भाजप................२० शिवसेना.............०५ काँग्रेस...............०४ अपक्ष................०१ एकूण................३० .......... शिरपूर पंचायत समिती भाजप..............२४ राष्ट्रवादी काँग्रेस....०१ अपक्ष..............०३ एकूण...............२८ .......... शिंदखेडा पंचायत समिती भाजप.................१४ महाविकास आघाडी..०६ एकूण..................२० ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जास्तीत जास्त झाडे वाचवून नवीन लागवडीवर भर देणार"

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

SCROLL FOR NEXT