धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन
--
लोगो छायाचित्र.......वीजेची कमान घेणे
--
वीजचोरीप्रकरणी ३१ जणांवर गुन्हे
-
अंबापूर, काशीपूर, देवनगरमधील पथकाची कारवाई
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : अंबापूर, काशीपूर आणि देवनगर (ता. साक्री) येथे जळगाव येथील वीज महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने केलेल्या धडक तपासणीत थेट एलटी लाइनवर आकडे टाकून बेकायदेशीर वीज वापरल्याचे उघडकीस आले. वीज चोरीची बिले व तडजोड रक्कम न भरल्याने एकूण ३१ जणांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
जळगाव येथील महावितरण कंपनीच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वप्निल माळी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. अंबापूर येथील तपासणीत १८ जण राहत्या घरांजवळील एलटी लाइनवरून वीज चोरी करताना आढळले. यात दोन हजार ५२० युनिट (७७ हजार ४०० रुपये) वीजचोरी आढळली. ३६ हजारांची तडजोड रक्कम निश्चित करण्यात आली.
-
साक्रीत गुन्हे दाखल
या प्रकरणी सुनीता संतोष मारनर, सुका बापू मारनर, पोपट चिंतामण मारनर, पंडित धोंडू मारनर, दादाजी गंगाराम कराडे, आबा सुखा मारनर, मोतिराम घमा डोमाळे, दिलीप तुकाराम मारनर, संजय धागू मारनर, जिमा सोमा मारनर, उत्तम सोमा मारनर, तनू शिवा मारनर, रमेश धवळू मारनर, सीताराम केरू मारनर, नथू केरू मारनर, शांताराम नान्हू मारनर, लक्ष्मण सोनू कराडे व देवा भिमा मारनर (सर्व रा. अंबापूर, ता. साक्री) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.
-
काशीपूरला तपासणी
तसेच काशीपूर येथे तपासणीतदहा जणांकडून एक हजार ४०० युनिट (४३ हजार रुपये) वीजचोरी उघड झाली. २० हजारांची तडजोड रक्कम निश्चित करण्यात आली. या प्रकरणी विठ्ठल गनूजी मारनर, उत्तम बुधा कराडे, लहानू अमू डोमाळे, रमेश बाबूलाल मारनर, गजमल बाबूलाल मारनर, दत्तू गंगाराम मारनर, नगू किसन मारनर, नाना नामदेव डोमाळे, पोपट कालू मारनर व नान अमृत मारनर (सर्व रा. काशीपूर, ता. साक्री) यांच्यावर गुन्हे दाखल केले.
-
देवनगरला कारवाई
देवनगर येथील तपासणीत तीन जणांकडून ४३० युनिट (१२ हजार ९०० रुपये) वीजचोरी आढळली. सहा हजारांची तडजोड रक्कम निश्चित केली. सोमा लहानू भाचकर, भगवान लहानू मारनर व सुभाष तापीराम कराडे (तिघे रा. देवनगर, ता. साक्री) यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. तिन्ही ठिकाणी एकूण चार ३५० युनिट वीज चोरीची एक लाख ३३ हजार ३०० रुपयांची रक्कम उघड झाली. संबंधितांनी वीज चोरीचे बिल व तडजोड रक्कम वेळेत न भरल्याने गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.