नाशिक

धुळे पशुधन चोरी

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 33715 धुळे : शेतमाल, पशुधन चोरी प्रकरणातील अटक झालेल्या संशयितांसोबत तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार. -- शेतमाल, पशुधन चोरटे गजाआड - धुळे तालुका पोलिसांकडून सव्वालाखांवर मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २७ : शेतातील कापूस, पशुधन आणि इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या दोघा संशयितांना धुळे तालुका पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून गाय, इन्व्हर्टरची बॅटरी, इलेक्ट्रिक मोटार, कार व ५० किलो कापूस, असा एकूण १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतमाल आणि पशुधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीवरून संशयितांचा शोध घेतला. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी कुणाल रवींद्र मोरे (वय २१, रा. कालिकादेवी नगर, गोळीबार टेकडी रोड, धोबी घाट परिसर, धुळे) आणि शब्बीर शाह सुलेमान शाह (वय ३९, रा. कबीरगंज, पाण्याच्या टाकीजवळ, पेठवाली मशीद परिसर, धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, रवींद्र माळी, संजय जाधव, रवींद्र सोनवणे, राहुल देवरे, विनोद आढावे, सुधीर शिरसाळे, प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT