नाशिक

पालकमंत्री आढावा बैठक

CD
धुळे : टुडे पान १ साठी... मेन -- फोटो क्रमांक : 33954 धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी राम भदाणे, भाग्यश्री विसपुते, बाबासाहेब बेलदार, विशाल आनंद, नितीन कापडणीस, शरद पवार आदी. -- दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली नको -- पालकमंत्री रावल : जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २९ : दुष्काळाच्या कठीण काळात शेतकऱ्यांवर बँकांनी सक्तीची कर्जवसुली करू नये. खासगी सावकारांच्या छळाविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा या चारही तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. - आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. - पाणी, चाराचे नियोजन करा जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ८२ टक्के पाऊस झाला असून चारही तालुक्यांत पावसाचा खंड पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रावल यांनी आगामी उन्हाळा आणि ऑगस्ट २०२७ पर्यंतची संभाव्य परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक गावाचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. पिण्याच्या पाण्यासाठी आणि पशुधनाच्या चाऱ्यासाठी आजपासूनच काटकसरीचे व प्रभावी नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर काम उपलब्ध व्हावे, यासाठी रोजगार हमी योजना आणि जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आदेश त्यांनी दिले. वनक्षेत्रातील वृक्षलागवड आणि भूजल पातळी वाढविण्याच्या कामांना प्राधान्य देण्यासही त्यांनी सांगितले. - शेतकरी कर्जमुक्तीला गती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यात ३६ हजार ३९० पात्र शेतकऱ्यांपैकी २९ हजार ३३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित प्रलंबित प्रकरणे व तक्रारी तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून दुष्काळग्रस्तांना प्रत्यक्ष दिलासा मिळवून द्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. - १४-१ ..चौकट.. १४-१ दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा दुष्काळाच्या सावटाखाली दिवाळी साजरी करणाऱ्या गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी, धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यांत मोफत आनंदाचा शिधा व अन्नधान्याचे वाटप चार नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पुरवठा विभागाला दिले. तसेच, पिकांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून एकाही पात्र शेतकऱ्याला शासकीय मदतीपासून वंचित ठेवू नका, असे त्यांनी बजावले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

Supreme Court: बँक खात्यातून पैसे गेल्यास भरपाई करुन देण्याची जबाबदारी बँकेची! सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

SCROLL FOR NEXT