धुळे : टुडे १ साठी...मेन
--
लोगो छायाचित्र क्रमांक ः 34404
--
शासनाकडे ५३६ कोटींच्या निधीची मागणी
-
जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त; नुकसानीचे पंचनामे पूर्ण
धनंजय सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील चारही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर महसूल व कृषी विभागाने युद्धपातळीवर संयुक्त पाहणी आणि अंतिम पंचनामे पूर्ण केले आहेत. या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यातील तीन लाख ८७ हजार ८७९.३९ हेक्टरवरील शेती आणि फळबागांची पिके पूर्णपणे वाया गेल्याचे समोर आले आहे. यातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे ५३६ कोटी ६५ लाख १८ हजार ७०५ रुपयांच्या निधी मागणीसंदर्भात मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
-
जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पेरणीयोग्य क्षेत्र असताना यंदा पुरेश्या पावसाअभावी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या पीक नुकसानीबाबत अहवालानुसार फळपिके वगळून जिरायत पिकाखालील एक लाख ५४ हजार २०२.३८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यातून एक लाख ४४ हजार ४९८ शेतकरी संकटात सापडले आहेत. तसेच, फळपिके वगळून बागायत पिकाखालील दोन लाख १८ हजार ५३३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यामध्ये दोन लाख सहा हजार ४४२ शेतकरी प्रभावित झाले आहेत. याशिवाय फळपिकाखालील १५ हजार १४३.५१ हेक्टर क्षेत्र बाधित असून १४ हजार ७१ शेतकरी बाधित झाले आहेत. यात अहवालानुसार तीन लाख ६५ हजार ११ शेतकरी या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आले आहेत.
-
निधीची प्रतीक्षा
जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे सर्व अंतिम पंचनामे पूर्ण करून शासनाकडे ५३६ कोटी ६५ लाख १८ हजार ७०५ रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. प्रशासनाने प्रस्ताव पाठवला असला तरी शासनाकडून प्रत्यक्षात हा निधी कधी वितरीत होणार आणि तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
-
आर्थिक विवंचना वाढली
खरीप हंगामातील हाती आलेले पीक पूर्णपणे वाया गेल्याने आगामी हंगामासाठी बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च कसा करावा, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ऐन हंगामात हाताशी काहीच न उरल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा आणि बँकांची कर्जे कशी फेडावीत या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र कोलमडले असून, या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीशिवाय दुसरा कोणताही आधार उरलेला नाही.
-
१४-१
..चौकट..
१४-१
जिल्ह्यातील पिक नुकसानीचा अहवाल
क्षेत्राचा प्रकार ---------------------बाधीत शेतकरी संख्या------------बाधीत क्षेत्र हेक्टर-------अपेक्षित मदत रक्कम
जिरायत पिकाखालील बाधीत क्षेत्र --------१,४४,४९८ ------------------१,५४,२०२.३८ --------१३१,०७,२०,२३०
बागायत पिकाखालील बाधीत क्षेत्र --------२,०६,४४२ ------------------२,१८,५३३.५० --------३७१,५०,६९,९००
फळपिका खालील बाधीत क्षेत्र -----------१४,०७१ --------------------१५,१४३.५१ ----------३४,०७,२८,९७५
एकूण -------------------------------३,६५,०११-------------------३,८७,८७९.३९---------५३६,६५,१८,७०५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.