नाशिक

मनपात आर्थिक साक्षरता मार्गदर्शन

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. अँकर -- फोटो क्रमांक : 33503 धुळे : महापालिका सभागृहात आर्थिक साक्षरता मार्गदर्शन वर्गात उपस्थित अधिकारी व कर्मचारांना मार्गदर्शन करताना धुळे सीए शाखेच्या अध्यक्षा सीए सोनी सोनार. शेजारी मान्यवर. -- मनपात कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता मार्गदर्शन वर्ग -- स्मार्ट गुंतवणूक आणि कर नियोजनावर सीए शाखेचे विशेष मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया पश्चिम विभागांतर्गत कार्यरत धुळे सीए शाखेच्या वतीने महापालिका सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता या विषयावर नुकताच एक विशेष मार्गदर्शनपर सेमिनार उत्साहात पार पडला. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमाचा उद्देश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. आजच्या धकाधकीच्या युगात योग्य आर्थिक नियोजन, सुरक्षित गुंतवणूक आणि भविष्यकालीन तरतूद महत्त्वाची ठरते. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून झालेल्या या मार्गदर्शन वर्गात कर्मचाऱ्यांना बचत, कर बचत आणि योग्य गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने सुरुवात झाली. नंतर सीए शाखेच्या वतीने उपस्थितांना आर्थिक नियोजनाचे विविध पैलू समजावून सांगण्यात आले. मनपाच्या उपायुक्त सोनाली देवरे, सीए शाखेच्या अध्यक्षा सीए सोनी सोनार, माजी अध्यक्ष सीए अविनाश घुंडीयाल, माजी अध्यक्ष सीए यश आंचलिया यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतात योग्य आर्थिक नियोजन व सुरक्षित गुंतवणूक हे उज्ज्वल भविष्यासाठी कसे आवश्यक आहे, हे सांगितले. सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तरांच्या तासात कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या विविध आर्थिक व करविषयक शंकांचे मान्यवरांनी निरसन केले. - स्मार्ट गुंतवणूकवर मार्गदर्शन या मार्गदर्शन सत्रात स्मार्ट गुंतवणूक व प्रभावी आर्थिक नियोजन या मुद्यांतर्गत पैशांची बचत कशी करावी, उपलब्ध बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक कशी करावी आणि महागाईवर मात करण्यासाठी स्मार्ट गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते, याची माहिती देण्यात आली. तसेच, आयकर विवरणपत्र व कायदेशीर कर बचत या अंतर्गत करदात्यांनी आपले आयकर विवरणपत्र वेळेत कसे भरावे आणि विविध कलमांतर्गत कायदेशीर मार्गाने कर बचत कशी करावी, याविषयी कायदेशीर व तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन व सुरक्षित भविष्य या मुद्यावर सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी तरुण वयातच किंवा सेवेच्या कालावधीतच भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक कशी करावी, यावर भर देण्यात आला.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT