नाशिक

पन्नास लाखांची मदत

CD
धुळे : टुडे पान ४ साठी..(शिल्लक बातमी) -- अतिवृष्टीग्रस्तांना पन्नास लाखांची मदत मंजूर -- आमदार भदाणेंच्या पाठपुराव्याला यश; ५६४ कुटुंबांना दिलासा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : धुळे तालुक्यात ३० आणि ३१ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि कन्हेरी नदीच्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले होते. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने भांडी, धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. आमदार राम भदाणे यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाकडून ४९ लाख ७४ हजार रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. या निधीचा लाभ तालुक्यातील ५६४ कुटुंबांना होणार असून, मदत रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. - अतिवृष्टीनंतर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते. मात्र निधी वितरणाची प्रक्रिया प्रलंबित होती. आमदार भदाणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून ही भरपाई मंजूर करून घेतली. यात ज्या कुटुंबांचे संपूर्ण संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले किंवा वाहून गेले अशा ४५३ बाधितांना प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे ४५ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. यात चिंचखेडे, वणी, मळाणे, अंचाळे तांडा, मुकटी, अंचाळे, वडगाव, शिरूड, कापडणे, भिरडाणे, नावरा, कासवीहिर, विश्वनाथ, सुकवड आणि अंबोडे या गावांचा समावेश आहे. तर घरांचे आणि साहित्याचे अंशतः नुकसान झालेल्या १११ कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रुपयेप्रमाणे चार लाख ४४ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. यात रानमळा, होरपडा, सोनगीर, अंचाळे, मांडळ, कुसुंबा, बांबुर्ले प्र. नेर, मोघण, नाणी, तरवाडे, जुन्नेर, मोरशेवडी, लळींग, तिखी, नंदाळे खुर्द, विंचूर, जुनवणे, बिलाडी, निमखेडी, बोरकुंड, रतनपुरा, अजंग, सातारणे, मोहाडी प्र. डांगरी, निमगुळ, खोरदड, कावठी, सावळी, वडजई, हेंद्रूण, बल्लाणे, हडसुणे, बोरविहीर, नावरा व नावरी या गावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT