नाशिक

महिलेवर अत्याचार प्रकरण

CD
धुळे टुडे ३ साठी... --- फोटो-NSK26H31632 धुळे : शहरातील रामदेवबाबा नगर भागातील विवाहितेवर सामुहिक अत्याचाराचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा यासह विविध मागण्यांचे निवेदन अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांना देतांना पुरोगामी विचार मंचचे पदाधिकारी. --- सामूहिक अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालवा --- पुरोगामी विचार मंचची पोलिस अधीक्षकांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : शहरातील नटराज सिनेमा परिसरातील रामदेवबाबानगर (चर्मकारवाडा) भागात एका २७ वर्षीय विवाहितेवर झालेल्या कथित सामूहिक अत्याचार प्रकरणी तीनही संशयितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. तसेच, पीडिता व तिच्या कुटुंबीयांना तत्काळ पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी पुरोगामी विचार मंचने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे सरचिटणीस हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन संशयितांनी मिळून पीडित महिलेवर सामूहिक अत्याचार केला आणि त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तसेच, ही बाब उघड केल्यास बदनामी करण्याची व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पीडित महिला अनुसूचित जातीची असल्याने या प्रकरणात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह इतर लागू असलेल्या कडक कायदेशीर कलमांचा समावेश करावा, अशी मागणी पुरोगामी मंचने केली. पोलिस संरक्षण द्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर संशयित व त्यांच्या नातेवाईकांकडून पीडितेवर आणि तिच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप शिष्टमंडळाने केला. अगदी पोलीस ठाण्याच्या आवारातही धमक्या दिल्या जात असल्याने पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. संशयित बाहेर राहिल्यास पीडित कुटुंबावर अधिक दबाव येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी कायद्यानुसार तातडीने पुढील पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी प्रा. बाबा हातेकर, गो. पी. लांडगे, पी. टी. बेडसे, मनोहर मोहिते, कॉ. एल. आर. राव, राजेंद्र अहिरे, पंडित गोसावी, बी. टी. अहिरे, पोपटराव चौधरी, श्रीकृष्ण बेडसे, रामकृष्ण शिंदे, बबनराव वानखेडे, दीपक सोनवणे, भगवान वाघ, महेंद्र पाटील, अशोक करंजे, धनंजय गाळणकर, किशोर शेजवळ व मोहंमद जैद आदी उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : “पेपरफुटी थांबलीच पाहिजे!” विद्यार्थी आंदोलनात उतरले सुजात आंबेडकर, मागण्यांना जाहीर पाठिंबा देत सरकारवर ताशेरे

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT