नाशिक

रंगणार गरबा महोत्सव

CD
धुळे ः टुडे २ साठी, ॲंकर -- धुळ्यात रंगणार गरबा महोत्सव - संस्कृती, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धनाचा संगम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : भारतीय जनता पक्षातर्फे शहरात धुळे गरबा महोत्सव २.० हा सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. ‘एक पाऊल पर्यावरणासाठी, एक संधी तुमच्या कलागुणांसाठी’ या प्रेरक संकल्पनेवर आधारित या महोत्सवात पारंपरिक गरबा, महिलांचे कलागुण, फॅशन शो यांसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. महिलांना सुरक्षित, उत्साही आणि आनंददायी वातावरणात एकत्र येता यावे तसेच त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नवरात्रोत्सवाचा हा सोहळा रंगणार आहे. - ‘स्वच्छ, सुंदर, हरित आणि सुदृढ धुळे’ हा संदेश देणाऱ्या या महोत्सवाच्या संकल्पक प्रियंका माने असून, भाजपसह नगरसेवक ललित माळी यांनी आयोजन केले आहे. शहरातील महिला, युवती आणि नागरिकांनी सहभागी होऊन या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. - महोत्सवाचे वेळापत्रक विशेष गरबा प्रशिक्षण : ६ ते १० ऑक्टोबर, वेळ- सायंकाळी ४ ते ६. यात पारंपरिक दांडिया व आधुनिक गरबा स्टेप्सचे धडे दिले जातील. गरबा महोत्सव : ११ ते १९ ऑक्टोबर यादरम्यान नऊ दिवस शहरात पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्याचा जल्लोष अनुभवता येईल. ‘ग्रँड फॅशन शो- मिस धुळे अँड मिसेस धुळे’: १८ ऑक्टोबरला होणाऱ्या या विशेष फॅशन शोमधून महिला व युवतींच्या व्यक्तिमत्त्वाला आणि आत्मविश्वासाला स्वतंत्र व्यासपीठ मिळवून दिले जाईल. - पर्यावरणाचा संदेश केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता हा महोत्सव सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपणार आहे. काही वर्षांपासून कार्यरत ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या माध्यमातून नागाववाडी टेकडी परिसरात सुमारे १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्यांच्या संगोपनासाठी ड्रिपची व्यवस्था करण्यात आली आहे. दुष्काळजन्य स्थिती टाळण्यासाठी ‘झाडे लावा- झाडे जगवा’ हा संदेश जनमानसात रुजवला जाणार असून, महोत्सवातील पाहुण्यांना पारंपरिक पुष्पगुच्छाऐवजी रोपे भेट देऊन पर्यावरण संरक्षणाचा वस्तुपाठ दिला जाणार आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT