नाशिक

पाट रस्ता धोकादायक

CD
धुळे : टुडे पान २ साठी... --- फोटो क्रमांक : 35201 धुळे : गांधी पुतळा ते पाट रस्ता परिसरातील प्रसाधनगृहाजवळ साचलेला कचऱ्याचा ढीग आणि उघडे पडलेले धोकादायक चेंबर. --- गांधी पुतळा ते पाट रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात चेंबरमुळे अपघाताची भीती; नागरिकांची गैरसोय सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : शहरातील मध्यवर्ती गांधी पुतळा चौकातून पाट रस्त्याकडे, तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाला सध्या अतिक्रमण, कचरा आणि निकामी साहित्याचा विळखा पडला आहे. यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आग्रा रोडवरील गांधी पुतळा परिसरात महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मात्र तेथील टपरी व हातगाडीधारकांनी आपले साहित्य थेट या पाट रस्त्यावर आणून ठेवले आहे. भविष्यात येथे कायमस्वरूपी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तसेच रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग आणि पडून असलेल्या निकामी मशिनरीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरील पुरुष प्रसाधनगृहाजवळील चेंबर उघडे असल्याने अपघाताची शक्यता आहे. दुसरीकडे येथील महिला प्रसाधनगृह दुरवस्थेमुळे असून नसल्यासारखेच झाल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Retire : महेंद्रसिंग धोनीने '7' चे गणित इथेही गाठले; चेपॉकवर निवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले, शेवटचा सामना कुठे व केव्हा खेळला?

यष्टिंमागचा 'योद्धा'; जो सामन्याला द्यायचा सहज कलाटणी, नाव सांगायची गरज नाही...

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Latest Marathi News Live Update : अमित शाहांवर टीका करणारे थापाडे, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

SCROLL FOR NEXT