नाशिक

घरे नियमित करा

CD
धुळे टुडे २ साठी... --- घरे नियमितीकरण आदेशाची अंमलबजावणी करा --- विनोद जगताप; धुळे महापालिका आयुक्तांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार २०११ पूर्वीच्या बांधकामांना नियमित (रेग्युलाईज) करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिका क्षेत्रातील मिल परिसरातील विविध वस्त्यांमधील १५ ते २० हजार घरे आणि बांधकामे तातडीने नियमित करावीत, अशी मागणी विनोद जगताप यांनी धुळे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मिल परिसरातील रासकर नगर, विखे नगर, गुरुकृपा नगर, तुळसाबाईचा मळा, शेलारवाडी, राऊळवाडी, लिलाबाईची चाळ, धनगर वाडा, हटकरवाडी, श्रीराम नगर, अयोध्या नगर, नारायण मास्तरची चाळ आणि फाशीपूल परिसर या सर्व वस्त्या गेल्या ४० ते ५० वर्षांपासून अस्तित्वात आहेत. या परिसरातील रहिवासी हे अत्यंत सर्वसामान्य, गोरगरीब आणि मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवणारे आहेत. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे या वस्त्यांना आजवर हक्काची कागदपत्रे व मान्यता मिळण्यात अडथळे येत होते. मुख्यमंत्र्यांचा निर्णयाने दिलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून २०११ पूर्वीची बांधकामे नियमित करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. या शासन निर्णयामुळे धुळे शहरातील मिल परिसरातील जुन्या वस्त्यांच्या नियमितीकरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे, असे श्री. जगताप यांनी म्हटले आहे. तातडीने कार्यवाही करावी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून धुळे महापालिकेने या सर्व वस्त्यांमधील बांधकामांना तातडीने नियमित करण्याचे आदेश काढावेत. यामुळे येथील १५ ते २० हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या हक्काच्या घरांच्या विकासाला आणि पुढील वाटचालीस चालना मिळणार आहे. महापालिकेने या प्रकरणी सकारात्मक व तत्काळ पावले उचलल्यास गोरगरीब नागरिकांमध्ये प्रशासनाची एक अत्यंत लोकभिमुख आणि स्वच्छ प्रतिमा निर्माण होईल, असा विश्वासही श्री. जगताप यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Numerology: करिअरमध्ये मोठी रिस्क घ्यायला घाबरत नाहीत 'या' मूलांकाचे लोक; नवीन स्किल्स शिकण्यात असतात नंबर वन!

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

SCROLL FOR NEXT