नाशिक

मोटारींच्या जोडण्या हटविल्या

CD
धुळे ः टुडे ३ साठी -- फोटो क्रमांक ः 33808 जामखेली : मध्यम प्रकल्प परिसरात अनधिकृत वीजजोडण्या खंडित करताना पाटबंधारे विभाग, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी. -- अनधिकृत १२५ मोटारींचे वीजजोड खंडित - जामखेली प्रकल्प परिसर : पाटबंधारेसह ‘महावितरण’ची कारवाई सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ : साक्री येथील पाटबंधारे उपविभागाअंतर्गत येणाऱ्या जामखेली मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नवानगर भागात अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणाऱ्या तब्बल १२५ विद्युत मोटारींच्या जोडण्या पाटबंधारे विभाग आणि महावितरण कंपनीच्या संयुक्त पथकाने कारवाई करत हटविल्या. धरणातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. संभाव्य दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक बनले आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या गरजेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे असल्याने सर्वांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व जबाबदारीने करावा, असे स्पष्ट आवाहन पाटबंधारे उपविभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, याच उपविभागाअंतर्गत येणाऱ्या अक्कलपाडा, लाटीपाडा आणि मालनगाव या इतर प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातही अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारींविरोधात अशीच धडक कारवाई करण्यात येणार आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा पूर्णपणे रोखण्यासाठी दोन्ही विभागांमार्फत ही संयुक्त मोहीम यापुढेही नियमितपणे राबवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. - १४-१ ...कोट... १४-१ प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची गरज प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा असल्याने त्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा. - पाटबंधारे उपविभाग, साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : महाराष्ट्र फोडायला दोन हजार कोटी कुठून आले? कर्जतच्या सभेतून राज ठाकरेंचा गंभीर आरोप

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT