धुळे टुडे २ साठी मेन...
---
फोटो- NSK26H33677
धुळे : मतदार यादीसंदर्भातील नमुना-७ बाबत तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना देतांना महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते.
---
नमुना सातच्या बेकायदेशीर वापराबाबत चौकशी करा
---
महाविकास आघाडी; पात्र मतदारांची नावे वगळण्यासाठी वापराच्या तक्रारी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : शहरातील हिंदू व मुस्लिमबहुल भागांसह विविध परिसरांतील पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नमुना क्रमांक- ७ (फॉर्म क्रमांक- ७) अर्ज दाखल केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे म्हणत याबाबत चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.
प्राथमिक माहितीनुसार प्रत्यक्ष स्थळपाहणी व आवश्यक पडताळणी न करता सुमारे ३०० ते ४०० नमुना क्रमांक- ७ अर्ज अनधिकृतपणे दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये संबंधित बूथ स्तरावरील अधिकारी (बीएलओ) किंवा सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित बाबींध्ये नियमबाह्य पद्धतीने अर्ज दाखल झाल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या प्रकारामुळे धुळे शहरातील हजारो पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः अल्पसंख्याक बहुल भागांतील मतदारांना यात लक्ष्य करुन अशा प्रकारचे अर्ज दाखल केले जात असल्याच्या तक्रारी गंभीर असून, त्यांची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मविआने म्हटले आहे.
मागण्या अशा
मतदार यादीतील नाव वगळण्याची प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर आणि नियमानुसार होणे आवश्यक आहे. त्यामुळे धुळे शहरात दाखल करण्यात आलेल्या सर्व संशयास्पद नमुना क्रमांक- ७ अर्जाची तातडीने सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. अर्जदारांची ओळख, अर्ज दाखल करण्यामागील कारणे, संबंधित कागदपत्रे आणि अर्जाची कायदेशीर वैधता यांची पडताळणी करण्यात यावी, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव केवळ संशयास्पद किंवा अनधिकृत अर्जाच्या आधारे मतदार यादीतून वगळण्यात येऊ नये, चौकशी पूर्ण होईपर्यत नियमानुसार आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नियमबाह्य, खोटे किंवा अनधिकृत आढळणारे अर्ज कायद्यानुसार रद्द करण्यात यावेत आणि संबंधित दोषींवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी आदी मागण्या महाविकास आघाडीने केल्या आहेत.
मविआतर्फे काँग्रेस जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, रमेश श्रीखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंदू यलमामे, शिवसेना (उबाठा) महानगर प्रमुख धीरज पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, राजेंद्र खैरनार, भिवसन आहिरे, जावेद देशमुख, नितिन देशमुख आदींनी मागणीचे निवेदन दिले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.