नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- तरुणावर चाकूहल्ला; दहा जणांविरुद्ध गुन्हा धुळे : शोभायात्रेदरम्यान समजावून सांगितल्याचा राग मनात धरून तरुणावर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक ललित आरूजा यांच्यासह दहा जणांविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटी परिसरात १३ एप्रिलला ही घटना घडली होती. ललित सतदेव तनेजा (वय ४६, रा. शिवशक्ती धाम, गुरुनानक सोसायटी) यांच्या फिर्यादीनुसार बहावलपुरी दिनानिमित्त आयोजित शोभायात्रेदरम्यान समाजाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी काही जणांना समजावून सांगितले होते. त्याचा राग आल्याने संशयितांनी तनेजा यांच्यासह दीपक तनेजा आणि नटवर तनेजा यांना अडविले. सहा जणांनी तनेजा यांना पकडून ठेवले, तर आशिष ऊर्फ आशु दीपक आरूजा याने पोटावर, मयूर नरेश सिंधी याने मानेवर आणि अतुल मनोज घुंडीयाल याने छातीवर चाकूने वार केले. छातीवरील वार चुकविताना तो हाताच्या दंडाला लागला. यात तनेजा जखमी झाले. मध्यस्थी करणाऱ्या साक्षीदारांना संशयितांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नगरसेवक ललित विरभान आरूजा, आशिष ऊर्फ आशु दीपक आरूजा, मयूर नरेश सिंधी, अतुल मनोज घुंडीयाल, हरु निरंजनदास पोपली, जतीन संजय भगत, अक्षय निलू कटारिया, भावेश अनिल रेल्वेन, अतुल नरेंद्र वधवा आणि देव निलु कटारिया (सर्व रा. कुमाननगर, साक्री रोड, धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - बस थांबविण्यावरून वाद; प्रवाशाचा मृत्यू धुळे : बस थांबविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात प्रवाशाला मारहाण केल्यानंतर तोल जाऊन पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शिरपूर शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली. महेंद्रसिंग गिरासे (रा. आमोदा, ता. शिरपूर) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. दोन ऑक्टोबरला सायंकाळी शिरपूर बसस्थानक परिसरात त्यांनी शिरपूर-जळगाव बस थांबवली होती. यावरून भटू साहेबराव पाटील (रा. वासुदेव बाबा, ता. शिरपूर) याने त्यांच्याशी वाद घातला. वादादरम्यान कानशिलात मारल्याने महेंद्रसिंग यांचा तोल जाऊन ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दिव्या महेंद्रसिंग गिरासे (वय २२) यांच्या फिर्यादीनुसार भटू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गुरुवारी (ता. ६) रात्री त्याला अटक केली. - कंटेनरच्या धडकेत चालक जागीच ठार धुळे : साक्री बायपासवरील देवनगर पेट्रोलपंपाजवळ समोरून येणाऱ्या वाहनाने कंटेनरला दिलेल्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला. अजहर हुसेन जफर (वय ४६, रा. बामळी, ता. दर्यापूर, जि. अमरावती) असे मृत चालकाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अजहर हुसेन हे कंटेनर (यूपी २१ ईटी ३८७८) घेऊन अमरावतीहून सुरतकडे जात होते. त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या वाहनाने (जीजे ०१ एलटी ४४९९) कंटेनरला धडक दिली. यात अजहर हुसेन यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, धडक देणाऱ्या वाहनाचा चालकही जखमी झाला. एजाज जफर हुसेन (वय ३४, रा. अलीलाल कॉलनी, अमरावती) यांच्या फिर्यादीनुसार संबंधित वाहनचालक सोहील मोहम्मद वारीस (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update: : पालघरमधील अतिदुर्गम हट्टीपाड्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; पांडुरंग शिंदेंच्या घरी जाऊन केले लक्ष्मीपूजन

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या शतकामुळे पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

SCROLL FOR NEXT