नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- ही बातमी टॉपला घेणे राजकीय वादातून कोयत्याने हल्ला धुळे : कलमाडी (ता. शिंदखेडा) येथे उपसरपंच विजेंद्र झालसे यांच्यासोबत सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असल्याच्या कारणावरून चतुर सुकलाल पाटील यांना सहा जणांनी धारदार कोयता व लोखंडी फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले. गुरुवारी (ता. २९) गावातील रस्त्यावर काही जणांनी पाटील यांना अडवून विजेंद्र झालसे यांच्यासोबत काम का करतो, अशी विचारणा केली. त्यानंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच लोखंडी फायटर व कोयत्याने हल्ला केला. गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा प्रकार घडला. गंभीर दुखापत झाल्याने पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी शिवाजी पुंडलिक पाटील, भावराव कौतिक पाटील, ललित रमेश पाटील, विनोद रमेश पाटील, नागराज शिवाजी पाटील व धर्मराज शिवाजी पाटील यांच्याविरुद्ध चतुर पाटील यांच्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - (......................शेवटी जोड द्यावा.........) - सोलर प्लांटची केबल चोरीला धुळे : मेलाणे (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या सोलर प्लांटवरील बारा सोलर जंक्शन व ५० मीटर डीसी वायर चोरट्यांनी नेली. याप्रकरणी मुख्याध्यापक रवींद्र वाडिले यांच्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - चौदा वर्षीय मुलाचा गळफासाने मृत्यू धुळे : दत्ताणे (ता. शिंदखेडा) येथे १४ वर्षीय मुलाचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २) सायंकाळी घडली. आई-वडील मजुरीसाठी शेतात गेले असताना मुलाने घराशेजारील पडक्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ग्रामस्थांनी याबाबत नरडाणा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: बनावट विदेशी मद्य साठ्याप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT