नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे ३ साठी, संक्षीप्त -- कंत्राटावरून अडवणूक; मारहाणीची धमकी धुळे : इंडो अमाइन्स कंपनीमध्ये मजूर कंत्राट मिळत नसल्याच्या कारणावरून रोहित भटू माळी (रा. सप्तशृंगी नगर, मालेगाव रोड, धुळे) यांची दुचाकी अडवून त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. ही घटना २८ सप्टेंबरला सायंकाळी सव्वासहा ते पावणेसातच्या सुमारास अवधान येथील उज्ज्वल पेट्रोल पंपासमोर घडली. रोशन वाघ व उमेश ठाकरे (दोघे रा. अवधान, ता. धुळे) यांनी माळी यांच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी लावून त्यांचा रस्ता अडविला. ‘इंडो अमाइन्स कंपनीमध्ये मजूर कंत्राट का देत नाही?,’ असा जाब विचारत शिवीगाळ केली व दुचाकीची चावी काढून घेतली. त्यानंतर माळी यांना हॉटेल फौजीच्या मागील बाजूस नेऊन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच साथीदारांसह कंपनीत येण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - छेडखानीवरून हाणामारी; दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा धुळे : मुलीच्या छेडखानीच्या कारणावरून वसमार (ता. साक्री) येथे दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी साक्री पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या. २९ सप्टेंबरला सायंकाळी एका ४० वर्षीय महिलेच्या घराजवळ दोघांनी येऊन ‘तुमची मुले माझ्या मुलीकडे बघतात,’ असे म्हणत शिवीगाळ केली. मुलांना मारहाण करून काठीने डोक्यात दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुसऱ्या गटातील ३९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारल्यावर दोघांनी शिवीगाळ करून हाताबुक्क्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सोपान धाकू आजगे, भूषण धाकू आजगे, भाऊसाहेब शिवदास कटके आदींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - भरधाव वाहनाने बसचालकाला मृत्यू धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्षी (ता. शिंदखेडा) शिवारात खुशी पेट्रोलपंपामागे रस्त्याच्या कडेला उभ्या बसजवळ गेलेल्या चालकाला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सलीमअली नतथी खान हे बस (एमपी ०९ एफए ९९५६) रस्त्याच्या कडेला उभी करून लघुशंकेसाठी गेले होते. तीस सप्टेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. यात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. याप्रकरणी सहबसचालक संदीप गौड (रा. गोपूर कॉलनी, अन्नपूर्णा रोड, इंदूर, मध्य प्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - भांडणाची कुरापत; तरुणाला मारहाण धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून धनराज शंकर पवार, सागर धर्मा पवार, विकी धर्मा पवार व भरत नारायण सोनवणे (सर्व रा. विटाभट्टी, धुळे) यांनी राहुल किशोर पवार (रा. कुंडणे, ता. धुळे) याला मारहाण केली. कॉटन मार्केट येथे २९ सप्टेंबरला दुपारी झालेल्या या घटनेत कुऱ्हाड व लोखंडी रॉडचा वापर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - नशेत धिंगाणा; दोघांवर कारवाई धुळे : देवपूर परिसरातील भतवाल टॉकीजजवळील सार्वजनिक प्रसाधनाजवळ दारूच्या नशेत धिंगाणा घालून गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर देवपूर पोलिसांनी कारवाई केली. रफिक मेहबूब पठाण (रा. गल्ली क्रमांक सहा, ग्रीन हॉटेलजवळ, देवपूर) आणि योगेश नथ्थू सूर्यवंशी (रा. गल्ली क्रमांक सहा, बापू भंडारी गल्ली, देवपूर) हे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालताना आढळले. त्यावरून देवपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - मुलीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा धुळे : वसमार (ता. साक्री) येथे अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी सोपान आजगे व भूषण आजगे याच्याविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना २९ सप्टेंबरला सायंकाळी घडली. याबाबत पीडितेच्या पालकांच्या फिर्यादीनुसार कारवाई झाली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT