नाशिक

जमीन हडपल्याचा आरोप

CD
धुळे ः टुडे जिल्हा पानासाठी --- फोटो क्रमांक ः 35223 धुळे ः जमीन बळकावल्याप्रकरणी प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करणारे मनेष हाके व सहकारी. --- बत्तीस एकर जमीन बळकावल्याचा आरोप शिरपूर तालुका ः ‘महसूल''ने कागदपत्रांत फेरफार केल्याची तक्रार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ ः शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष के. डी. पाटील यांनी ३२ एकर जमीन बळकावल्याचा खळबजनक आरोप बापू हटकर यांनी केला आहे. प्रशासनाच्या चालढकल भूमिकेमुळे मंगळवार (ता. १७)पासून त्यांचे पुतणे मनेष हाके बेमुदत उपोषण करत असून, याकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण कुटुंबीय आत्मदहन करेल, असा गंभीर इशारा श्री. हटकर यांनी सोमवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिला. श्री. हाके यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. अजनाड बंगला (ता. शिरपूर) येथील रहिवासी बापू हटकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांना १९५५ मध्ये शासनाकडून भोगवटादार वर्ग-२ ची जमीन शेतीसाठी मिळाली होती. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या तरतुदीनुसार १ एप्रिल १९५७ या कृषकदिनी भूमीहीन व्यक्ती प्रत्यक्ष कसत असल्याने तत्कालीन मामलेदार यांनी कुळघोषित करत ३२ एकर जमीन मंजूर केली होती. या जमिनीवर १९९८ पर्यंत त्यांचा ताबा होता. मात्र, १९९८ मध्ये श्री. पाटील यांनी बळाचा वापर करत शेतीचा ताबा घेतल्याचा आरोप हटकर यांनी केला. न्याय मिळत नाही याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल याचिका प्रलंबित असतानाही शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी कागदपत्रांत फेरफार करून संबंधित जमीन के. डी. पाटील यांच्या पूर्वजांची दाखवली आणि कायदेशीर कुळाचे नाव ‘रेकॉर्ड''वरून कमी केल्याचा संतापजनक प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने माहिती अधिकारात माहिती मागितली असता, ज्या तहसीलदारांवर गैरमार्गाने नावे बदलल्याचा आरोप आहे, त्याच तहसीलदारांकडे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रशासनाने केलेली ही थट्टा असून, या प्रकरणी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. न्याय न मिळाल्यास सरकारला आमचा ''धर्मा पाटील'' करायचा आहे का, असा संतप्त सवाल करत आंदोलक हाके यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. --- १४-१ कोट संबंधित प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने सद्यःस्थितीत अधिक बोलणे उचित ठरणार नाही. आम्ही कायद्याचा आणि न्यायालयाचा आदर करतो. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. - के. डी. पाटील, अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Scheme : केवायसी सुरू झाल्याच्या अफवेने महिलांची धावपळ; लाडकी बहीण योजनेबाबत अधिकृत घोषणा नसतानाही केंद्रांवर गर्दी

Daund Court : दौंड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

तेजस्वी सातपुतेंची बदली खरातच्या माध्यमातून? रुपाली ठोंबरेंचे गंभीर आरोप; चाकणकरांनाही केले लक्ष्य

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

SCROLL FOR NEXT