धुळे टुडे १ साठी ॲंकर...
---
फोटो-
ॲड. जगदीश सूर्यवंशी- NSK26H34214
ॲड. दिनेश गायकवाड- NSK26H34215
ॲड. नितेश बोरसे- NSK26H34216
ॲड. समीर सोनवणे- NSK26H34217
---
लॉ लायब्ररीच्या चेअरमनपदी ॲड. जगदीश सूर्यवंशी
---
चुरशीच्या लढतीत बाजी; व्हाइस चेअरमनपदी ॲड. गायकवाड, सेक्रेटरीपदी ॲड. सोनवणे, ॲड. बोरसे
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : धुळे डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीचीच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. चेअरमनपदासाठी अत्यंत चुरशीच्या लढतीत ॲड. जगदीश सूर्यवंशी यांनी अवघ्या तीन मतांनी बाजी मारली. व्हाइस चेअरमनपदी ॲड. दिनेश गायकवाड यांनी तर सेक्रेटरीपदी ॲड. समीर सोनवणे आणि ॲड. नितेश बोरसे विजयी झाले.
धुळे बार असोसिएशनच्या डिस्ट्रीक लॉ लायब्ररीच्या २०२६-२०२८ या द्विवार्षिक कालावधीसाठी निवडणुक झाली. एकूण एक हजार ४४ मतदार असलेल्या या निवडणुकीत चेअरमन, व्हाइस चेअरमन आणि दोन सेक्रेटरी पदांसाठी ही निवडणूक झाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आणि मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. चेअरमनपदासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. यात चेअरमनपदी ॲड. सूर्यवंशी हे अवघ्या तीन मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण ३४१ मते मिळाली, त्यांचे प्रतिस्पर्धी संजय शिंपी यांना ३३८ तर जितेंद्र निळे यांनी ८९ मते मिळाली. व्हाइस चेअरमनपदासाठी ॲड. गायकवाड आणि ॲड. राहुल देसले- पाटील यांच्यात सामना झाला. या लढतीत ॲड. गायकवाड यांनी विजय मिळविला. ॲड. गायकवाड यांना ४३५ मते प्राप्त झाली. ॲड. देसले- पाटील यांना ३३२ मते मिळाली. सेक्रेटरीपदाच्या दोन जागांसाठी ॲड. समीर सोनवणे, ॲड. नितेश बोरसे आणि ॲड. नितीन गवळी यांच्यात लढत झाली. यात ॲड. सोनवणे आणि ॲड. बोरसे यांनी विजय मिळवत सेक्रेटरीपदाचा मान पटकाविला. ॲड. सोनवणे यांना ४७२, ॲड. बोरसे यांना ५२१, तर ॲड. गवळी यांना ४२२ मते मिळाली.
आता विकासाची अपेक्षा
डिजिटल लायब्ररी, शासकीय निधी, कनिष्ठ वकिलांसाठी सुविधा, अभ्यासासाठी उत्तम वातावरण आणि लायब्ररीचा सर्वांगीण विकास या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली.
---
...चौकट...
नवनियुक्त पदाधिकारी असे
चेअरमन- ॲड. जगदीश सूर्यवंशी, व्हाइस चेअरमन- ॲड. दिनेश गायकवाड, सेक्रेटरी- ॲड. समीर सोनवणे, ॲड. नितेश बोरसे, कार्यकारिणी सदस्य- ॲड. अमोल पाटील, ॲड. गजानन माळी, ॲड. महेश मराठे, ॲड. प्रभाकर वाघ, ॲड. सागर तापकिरे, ॲड. शशिकांत पवार, ॲड. संयम कापडिया, ॲड. प्रथमेश दीक्षित, ॲड. जयेश बाविस्कर. कार्यकारिणी सदस्य (महिला)- ॲड. अश्विनी कर्णे, ॲड. वंदना मोरे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.