नाशिक

तीव्र जनआंदोलनाचा इशारा

CD
धुळे ः टुडे २ साठी -- धुळ्यात वाचनालय प्रकरणी तीव्र जनआंदोलनाचा इशारा -- दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १० : शहरातील देवपूर भागातील अंडाकृती गार्डनजवळ मागील २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत असलेली क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासनमान्य सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका व वाचनालयाची इमारत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता पाडण्यात आली. या मनमानी आणि बेकायदेशीर कारवाईमुळे आंबेडकरी अनुयायी आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये संताप असून, सामाजिक न्याय हक्कासाठी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष गोविंद कांबळे यांनी पत्रकाव्दारे दिली. श्री. कांबळे यांनी म्हटले आहे, की शासकीय फंडातून हे ग्रंथालय उभारण्यात आले होते. वाचनालयाबाबतचा प्रस्ताव महापालिकेकडे प्रलंबित असताना आणि न्यायालयीन निकाल वाचनालयाच्या बाजूने लागलेला असतानाही त्याविषयी आदेशाची महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. तीन एप्रिल २०२५ ला न्यायालयाने मनपाला तीन लाखांचा दंड व पर्यायी जागा देण्याचे आदेश दिले होते; मात्र प्रशासनाने इमारत जमीनदोस्त केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून राजकीय दबावाखाली ही कारवाई केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून १५ लाख रुपयांची भरपाई त्यांच्याकडून वसूल करावी आणि वाचनालयास ही रक्कम देण्यात यावी, अशी मागणी श्री. कांबळे यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Manipur Violence : मणिपूर पु्न्हा पेटलं! २४ तासांत ९ जणांची हत्या, १४ घरांना लावली आग; कांगपोकपी जिल्ह्यात बंदची हाक

High Court Security Breach : तोंडाला रुमाल बांधून हायकोर्टात घुसल्या दोन महिला; प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस घालत सीसीटीव्ही फोडले!

Numerology: 'या' मूलांकांचे लोक नेहमी न्यूनगंडाने घेरलेले असतात; इतरांच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होतो

Karmad Tomato Market : करमाडच्या टोमॅटो बाजारपेठेत रोज ५० लाखांची उलाढाल! चार महिने चालतो हंगाम; रोख पेमेंट, चांगला भाव अन् ५०० जणांना रोजगार

SCROLL FOR NEXT