नाशिक

टुडे पान २ साठी... अवतीभवती

CD
धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती -- फोटो : 34249 ‘नांदी’ संमेलनाच्या अध्यक्षपदी सूर्यवंशी धुळे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे होणाऱ्या नांदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अहिराणी भाषा व संस्कृतीचे अभ्यासक आणि खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. मसाप पुणेचे अध्यक्ष योगेश सोमन यांच्या उपस्थितीत जयहिंद महाविद्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. प्रा. डॉ. सूर्यवंशी हे श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या साहित्य व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत १९ साहित्य संमेलनांचे आयोजन केले आहे. त्यांच्या ‘घरवावर’सह विविध पुस्तकांना प्रतिष्ठा लाभली असून, त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार कुणाल पाटील, उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. टी. पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. जितेंद्र तलवारे, प्राचार्य प्रा. डॉ. आशुतोष पाटील, मुख्याध्यापक शंकरराव देवरे, रमेश बोरसे, सुभाष आहिरे, प्राचार्या रत्नाताई पाटील, डॉ. फुला बागूल आदींनी समाधान व्यक्त केले. -- धुळ्यात नशामुक्त जनजागृती रॅली धुळे : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरी करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून, पोलिस विभाग आणि एस.एस.व्ही.पी. एस. विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘Fight Against Drugs’ ही सामाजिक जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आणि युवकांना अमली पदार्थांच्या घातक दुष्परिणामांपासून दूर ठेवणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हातात फलक झळकावत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. प्रभारी पोलिस अधिकारी प्रतापसिंग मोहिते, वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एम. बोरसे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. के. पाटील, प्रा. डॉ. पी. बी. नेरपगार उपस्थित होते. -- हिंदी साहित्यावर प्रा. पाटीलांचे व्याख्यान धुळे : केंद्रीय हिंदी निदेशालयाच्या प्राध्यापक व्याख्यानमालेअंतर्गत विद्यावर्धिनी महाविद्यालय येथील उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख प्रा. योगेश पाटील यांनी पंजाब विद्यापीठ (चंदीगड), हिमाचल प्रदेश विद्यापीठ (शिमला) आणि शासकीय महाविद्यालय (सोलन) येथे नऊ व्याख्याने सादर केली. या दौऱ्यात त्यांनी ‘भारतीय स्वातंत्र्यआंदोलन आणि हिंदी साहित्य’, ‘दुष्यंत कुमार यांच्या गझलांमधील चिंतन’, ‘हिंदीचा जागतिक प्रसार व रोजगाराच्या संधी’, ‘अमरकांत यांच्या कथांमधील मध्यवर्ग’ आणि ‘भारतीय ज्ञानपरंपरेची निरंतरता’ या विषयांवर विचारमंथन केले. भाषा, साहित्य आणि रोजगाराच्या संधींचा संबंध स्पष्ट करणाऱ्या या व्याख्यानांमुळे शैक्षणिक संवादाला चालना मिळाली. प्रा. पाटील यांच्या या यशाबद्दल विद्यावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष अक्षय छाजेड, सचिव व खजिनदार युवराज करनकाळ, अध्यक्ष डॉ. शरद पाटील, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी कौतुक केले. -- शहरात मोकाट जनावरांचा त्रास धुळे : शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर कायम आहे. मुख्य स्ते, चौकात मोकाट जनावरे अनेकदा उभे राहतात. तसेच, रस्त्याने फिरतांनाचे दृश्य नेहमीचेच आहे. महापालिकेतर्फे यावर कारवाई करण्यात येत असल्याचा दावा करत असले तरी, मोकाट जनावरांचा प्रश्न शहरातून सुटलेला नाही. दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळी देखील ही मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने अनेकदा अपघात घडतात. मोकाट कुत्र्यांचा देखील त्रास वाढला असून, यावर बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

Paragao farmers: एक एकरात १३५ टन उसाचे उत्पादन; पारगावच्या शिक्षक दांपत्याची शेतीत कमाल

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT