Dr . Tushar shewale esakal
नाशिक

Dhule Lok Sabha Constituency : धुळ्यासाठी मतदार संघातीलच उमेदवार द्यावा : डॉ. शेवाळे

Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा दावा कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा दावा कायम आहे. डॉ. शेवाळे काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. निवडणुकीत मतदारसंघातीलच उमेदवार द्यावा, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीने भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. (Dhule Lok Sabha Constituency dr tushar shewale statement of Candidates )

त्यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. महायुतीत धुळ्याची जागा काँग्रेसकडे आहे. पक्षाकडून नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे येथील पक्षनेते श्‍याम सनेर यांच्या नावाची सुरवातीपासूनच चर्चा आहे. दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. काही दिवसांपासून नाशिक व नंदुरबार भागांतील काही जणांची नावे चर्चेत येत आहेत.  (latest marathi news)

डॉ. शेवाळे व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मतदार संघातीलच उमेदवार देण्याचा आग्रह धरला आहे. पंधरा वर्षांपासून आपण पक्षाकडे उमेदवारी मागत आहोत, उमेदवारी मिळाली नसली तरी प्रत्येकवेळी प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले. या वेळी पक्षनेतृत्वाने संधी द्यावी.

भाजपचे आव्हान पेलण्यासाठी बाहेरचा उमेदवार देऊ नये. तसे झाल्यास मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावतील. याचा विपरीत परिणाम निवडणुकीवर होईल, अशी भूमिका त्यांनी पक्षनेतृत्वापुढे मांडल्याचे सांगण्यात आले. स्थानिक जनतेची भावना लक्षात घेऊन उमेदवार द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT