धुळे : टुडे पान १ साठी.. सेकंड मेन
---
फोटो क्रमांक : 31965
धुळे : जिल्हा मराठी व अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रंथांचे व स्मरणिकेचे प्रकाशन करताना पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी प्रा. एल. जी. सोनवणे, अनुप अग्रवाल, डॉ. सुभाष भामरे, मायादेवी परदेशी, भा. ई. नगराळे, जे. टी. देसले, प्रा. संजीव गिरासे आदी मान्यवर.
---
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वाचनसंस्कृती जपावी
जयकुमार रावल : धुळ्यात सहावे जिल्हा मराठी व अहिराणी साहित्य संमेलन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात एका क्लिकवर माहिती उपलब्ध होत असली तरी तिचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी वाचन, लेखन, चिंतन आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता जपणे काळाची गरज आहे. जिल्ह्याला लाभलेला समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्राचार्य सदाशिवराव माळी साहित्य नगरीत झालेल्या सहाव्या जिल्हा मराठी साहित्य संमेलन व अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासनाचा मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून, तसेच अहिराणी साहित्य परिषद व साहित्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन झाले. महापौर मायादेवी परदेशी, स्वागताध्यक्ष तथा आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार डॉ. शरद पाटील, संमेलनाध्यक्ष प्रा. एल. जी. सोनवणे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, प्रा. आशुतोष पाटील, कवी प्रकाश होळकर, भा. ई. नगराळे, जे. टी. देसले, जगदीश पाटील, विद्यावर्धिनी सभेचे सचिव युवराज करनकाळ, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. संजीव गिरासे, अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य भगवान पाटील, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, डॉ. शेखर सूर्यवंशी, अहिराणी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश महाले, सचिव प्रभाकर शेळके उपस्थित होते. संमेलनात पालकमंत्री रावल यांच्या हस्ते ‘साहित्यिकांचे गाव’ या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. मुख्य सोहळ्यात स्मरणिकेसह ‘अक्षयगंध’ आणि ‘पायजा’ ग्रंथांचे प्रकाशन झाले. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. क. उ. संघवी आणि कवी प्र. अ. पुराणिक यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
---
भाषा संस्कृती जपणारी शक्ती
संमेलनाध्यक्ष प्रा. सोनवणे म्हणाले, की भाषा ही केवळ विचार व भावना व्यक्त करण्याचे साधन नसून समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपणारी शक्ती आहे. मानवी संस्कृतीच्या विकासात शेती व भाषेचा शोध हे दोन महत्त्वाचे टप्पे ठरले. शेतीमुळे स्थैर्य मिळाले, तर भाषेमुळे विचार आणि भावना एकमेकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले. लिपीच्या शोधामुळे हे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता आले. मराठी व अहिराणी भाषांचे जतन करून हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---
१४-१
चौकट
अहिराणी संवर्धनासाठी मदत
पालकमंत्री रावल यांनी जिल्हा साहित्य संमेलनाचे अनुदान एक लाखांवरून पाच लाख केल्याचे सांगत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दर वर्षी अतिरिक्त पाच लाख आणि अहिराणी पुस्तकांच्या छपाईसाठी अडीच लाख देण्याची घोषणा केली. तसेच शहरात ग्रंथालय आणि सभागृहाने सज्ज ‘अहिराणी भाषा व साहित्य संवर्धन केंद्र’ उभारण्याचा संकल्प मांडला. अहिराणी ही खानदेशची संस्कृती व अस्मिता असून, घराघरांत अहिराणी बोलली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. स्वागताध्यक्ष आमदार अग्रवाल यांनी मराठी व अहिराणीचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीला देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.