गुन्हेगार नदीम काल्यावर प्राणघातक हल्ला
----
म्हशींच्या वादातून धुळे कृषी बाजार समिती परिसरातील घटना
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास सराईत गुन्हेगार नदीम काल्या याच्यावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी केलेल्या गंभीर मारहाणीत नदीमच्या हात-पायांची हाडे मोडली आहेत. पूर्ववैमनस्य किंवा म्हशींच्या खरेदी-विक्रीच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक चर्चा परिसरात सुरू आहे.
सराईत गुन्हेगार नदीम काल्या हा बुधवारी पहाटे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असताना, अनोळखी टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी दगडांनी गंभीर मारहाण केली. यात त्याच्या हात-पायांवर दगड टाकून हाडे मोडण्यात आली. नदीम काल्या हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरीसह अनेक उपद्रवी गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
बाजार समितीत चोरटे
गंभीर जखमी झालेल्या नदीमला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे; तरीही चोरट्यांचा वावर कमी झालेला नाही. गेल्या काही दिवसांत जनावरांच्या चोरीवरून या ठिकाणी मोठे वाद निर्माण झाले असून मारहाणीच्या घटनाही वारंवार घडत आहेत. भविष्यात येथे एखादी गंभीर किंवा जीवितहानीची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धुळे बाजार समिती व्यवस्थापनाने आणि पोलिसांनी या परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस कारवाई करावी, अशी तीव्र मागणी पीडितांसह स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.