नाशिक

हिरे मेडिकलला लोचखोर

CD
अधिष्ठात्यांचा लघुलेखकच जाळ्यात --- हिरे मेडिकलला मध्यस्थासह लाच घेताना अटक सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ ः ऐन दिवाळीत येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अधिष्ठात्यांचा लघुलेखक सुदेश मानकर (वय ५५) याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. धनत्रयोदशीला दुपारी साडेतीनच्या सुमारास शुक्रवारी (ता. ६) अधिष्ठात्यांच्या कार्यालयात ही कारवाई झाली. या प्रकरणी मध्यस्थाची भूमिका बजावल्याच्या आरोपावरून श्रीराम शंकर मोरे यालाही ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार शासकीय कर्मचारी असून, दीर्घकालीन रजेनंतर सेवेत रुजू होण्यासाठी त्यांना वैद्यकीय समितीचे प्रमाणपत्र आवश्यक होते. हे काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागितल्याचा आरोप आहे. पैकी पाच हजार रुपये मोरे याने मध्यस्थी करत स्वीकारले, तर उर्वरित दहा हजार रुपये मानकर याने कार्यालयात स्वीकारताच सापळा रचून बसलेल्या पथकाने त्याला पकडले. संशयित दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नंतर त्यांना अटक झाली. या कारवाईचे पर्यवेक्षण पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी केले. पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, रामदास बारेला यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: या दिवाळीला Gen-Z कुठे गुंतवणूक कराताएत? खरेदीचा ट्रेंड काय आहे? नव्या पिढीचे पैसा गुंतवण्याचे मार्ग कोणते?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

Breast Cancer: स्तनाचा कर्करोग एकच, पण उपचार वेगवेगळे! प्रत्येक महिलेसाठी स्वतंत्र उपचारयोजना का महत्त्वाची?

SCROLL FOR NEXT