नाशिक

स्वागतासाठी तयारी पूर्ण

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. मेन -- फोटो क्रमांक : 31884, 31886, 31887 धुळे : शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी दाखल श्री दुर्गादेवीच्या आकर्षक मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेच्या तयारीसाठी मातीचे घट, पूजा साहित्य, ओटीचे कपडे आणि नारळ खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग. तर शेवटच्या छायाचित्रात देवीच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांची खरेदी करताना भाविक. (छायाचित्रे : गोरख गर्दे) -- जिल्ह्यात आदिशक्तीच्या स्वागतासाठी तयारी पूर्ण -- शारदीय नवरात्रोत्सव : घटस्थापनेने चैतन्य, देवी मंदिरांत विद्युत रोषणाई, भाविकांची लगबग सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १० : आदिशक्ती आणि स्त्रीशक्तीच्या उपासनेचा पवित्र उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (ता. ११) भक्तिभावात प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी आणि मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करून देवीच्या आराधनेला सुरुवात केली जाणार आहे. या नऊ दिवसांच्या काळात शहर आणि जिल्ह्यात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार असून, देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळणार आहे. - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समित्यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर, कालिका माता मंदिर, तसेच ग्रामीण भागातील चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील पेडकाई माता मंदिर, पाटण (ता. शिंदखेडा) येथील आशापुरी माता मंदिर, महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील जागृत बडी बिजासणी माता मंदिरांत विशेष तयारी झाली आहे. यासह म्हसदी (ता. साक्री) येथील धनदाईमाता, भटाई (ता. धुळे) येथील भटाई माता, रावेर (ता. धुळे) येथील नंदाभवानी देवी, कापडणे (ता. धुळे) येथील जोगाई माता, कोकले (ता. साक्री) येथील नागाई माता, शिरूड (ता. धुळे) येथील कालिका माता आणि निजामपूर (ता. साक्री) येथील म्हसाई माता यास जिल्ह्यातील विविध मंदिरांची परिसर स्वच्छता, आकर्षक सजावट आणि पूजेची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वच मंदिरांवर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाल्याचे दिसून येत आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ विविध धार्मिक कार्यक्रम उत्सवादरम्यान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, आरती, भजन, कीर्तन तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरीही घटस्थापनेची लगबग सुरू असून पूजेसाठी लागणारे घट, फुलांचे हार, नारळ, फळे आणि साहित्याच्या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाईल. उपवास, जप, पारायण, आरती आणि गरबा-दांडियाच्या माध्यमातून जिल्ह्यात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. विजयादशमीच्या दिवशी दसरा साजरा करून या उत्सवाची सांगता होईल. भक्ती, श्रद्धा आणि शक्तीच्या या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Manipur Violence : मणिपूर पु्न्हा पेटलं! २४ तासांत ९ जणांची हत्या, १४ घरांना लावली आग; कांगपोकपी जिल्ह्यात बंदची हाक

High Court Security Breach : तोंडाला रुमाल बांधून हायकोर्टात घुसल्या दोन महिला; प्रतिबंधित क्षेत्रात धुडगूस घालत सीसीटीव्ही फोडले!

Numerology: 'या' मूलांकांचे लोक नेहमी न्यूनगंडाने घेरलेले असतात; इतरांच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होतो

Karmad Tomato Market : करमाडच्या टोमॅटो बाजारपेठेत रोज ५० लाखांची उलाढाल! चार महिने चालतो हंगाम; रोख पेमेंट, चांगला भाव अन् ५०० जणांना रोजगार

SCROLL FOR NEXT