नाशिक

पिंपळनेर गुटखा कारवाई

CD
धुळे : टुडे १ साठी... -- फोटो क्रमांक : 34372 पिंपळनेर : प्रतिबंधित गुटखा कारवाईतील जप्त वाहनांसह ताब्यात घेतलेले संशयित. शेजारी अन्न व औषध प्रशासनाचे पथक, पोलिस कर्मचारी. -- पिंपळनेरला ३१ लाखांचा गुटखा जप्त -- अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; तीन संशयितांवर गुन्हा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : राज्यात शासनाने विक्री व साठवणुकीवर बंदी घातलेला गुटखा, पानमसाला छुप्या पद्धतीने पिंपळनेरमध्ये साठवून विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. पिंपळनेर येथील सटाणा रोडवरील ईदगापाडा परिसरातील भारत गॅस गोदामाजवळ केलेल्या या धाडीत ३० लाख ९१ हजार ९०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन संशयितांविरूध्द पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - अन्न व औषध प्रशासनाला पिंपळनेर येथे प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली. या आधारे प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (ता. ३) रात्री दोनच्या सुमारास सटाणा रोडवरील भारत गॅसजवळ ईदगापाडा येथे छापा टाकला. यादरम्यान वाहनांची तपासणी केली असता एमएच ४६ बीएम ६०९७ आणि एमएच ४६ बीयू ७८८५ या क्रमांकांच्या वाहनात प्रतिबंधित पानमसाला, गुटखा व तंबाखूचा साठा आढळला. तो पिंपळनेर पोलिस ठाण्यात आणण्यात आला. मोजमापानंतर २० हजार ३८२ पॅकेट्स आढळले. त्यांची बाजारभावानुसार किंमत ३० लाख ९१ हजार ९०० असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी साहेबराव वनजी साबळे, गणेश वनजी साबळे, संदीप गुलाब ठाकरे (सर्व रा. बल्हाणे, ता. साक्री) या तीन संशयितांविरोधात गुन्हा नोंद झाला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने, सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत, मंगेश भावसार यांच्या पथकाने केली.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT