धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 32866
धुळे : साक्री रोडलगतच्या अतिक्रमणाबाबत भाजीपाला, फळविक्रेत्यांना सूचना देताना पोलिस निरीक्षक अर्चना पाटील व सहकारी.
--
धुळ्यात अतिक्रमणधारकांवर पोलिसांचा बडगा
-
साक्री रोडवरील भाजीपाला, फळविक्रेत्यांना साहित्य हटविण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : शहरातील वाढती वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी शनिवारी (ता. १७) साक्री रोडवर धडक मोहीम राबविली. यात रस्त्यालगत व पदपथावर अतिक्रमण करून भाजीपाला आणि फळ विक्री करणाऱ्या दुकानदारांना पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कडक शब्दात साहित्य हटविण्याची सूचना दिली.
रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, तसेच यापुढे पांढऱ्या पट्ट्यांबाहेर स्टॉल किंवा साहित्य आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिला. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकासमोर बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करून वाहतुकीची कोंडी करणाऱ्या चालकांना शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले यांनी तडाखा देत ताकीद दिली. रिक्षा विहित रांगेतच उभ्या करून वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.