नाशिक

१९ संशयित ताब्यात

CD
धुळे ः टुडे ३ साठी --- मिल परिसरात जुगारअड्ड्यावर छापा अडीच लाखांचा विविध मुद्देमाल जप्त; १९ संशयित ताब्यात सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ ः शहरातील मिल परिसरातील शासकीय दूध डेअरी रोडवरील अण्णासाहेब पाटीलनगराजवळ काटेरी झुडपांमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीनपत्ती जुगारअड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखा आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (ता. १) रात्री छापा टाकला. या कारवाईत १९ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३८ हजार ५४० रुपये रोख, सात दुचाकी आणि दहा मोबाईल, असा एकूण दोन लाख ५६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना जुगार अड्ड्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी आणि शहर पोलिसांच्या पथकाने शासकीय दूध डेअरी रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. तेथे ५२ पत्त्यांच्या कॅटवर तीनपत्ती हारजितचा जुगार सुरू असल्याचे आढळले. जप्त मुद्देमालात ३८ हजार ५४० रुपये रोख, एक लाख ५० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी आणि ६८ हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल यांचा समावेश आहे. पोलिस हवालदार प्रल्हाद वाघ यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात ताब्यातील सर्वांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत अजय विभुते ऊर्फ छोटू, मुख्तार बब्बू मेहतर (रा. सोनगीर, ता. धुळे), अजगर अली हैदर (रा. मालेगाव, जि. नाशिक), मच्छिंद्र भास्कर लष्कर (रा. चक्करबर्डी, धुळे), शेख शफीक शेख कालू (रा. हजारखोली, मालेगाव), साजिद हुसेन मोहम्मद राशिद (रा. मौलवीगंज, धुळे), राशिद मोहम्मद शेख (रा. वणी, ता. धुळे), मयूर रमेश हुंडिवाले (रा. राऊळवाडी, चितोड रोड, धुळे), दिलीप नारायण खोब्रागडे (रा. अमरनगर, धुळे), सुनील भिकन शिंदे (रा. दंडेवालेबाबानगर, मोहाडी), दीपक सुरेश चौहान (रा. विखेनगर, शेलारवाडी, धुळे), अर्जुन अशोक राकुंडे (रा. मोहाडी, धुळे), मोहन राजाराम वाघ (रा. पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे), मोबीन सय्यद रऊफ (रा. अमरनगर, धुळे), चंद्रकांत रामचंद्र कोळवले (रा. राऊळवाडी, धुळे), सलीम शाह सिकंदर शाह (रा. काझी प्लॉट, वडजाई रोड), देवराम मल्हारी सोनवणे (रा. नटराज टॉकीजजवळ, धुळे) आणि प्रवीण मदन महाले (रा. संबोधीनगर, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT